शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीला त्रास दिल्याचा काढला वचपा, कोल्हापुरात निर्जन माळावर तरुणाचा निर्घृण खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 17:40 IST

संकेत हा प्रतीकच्या प्रेयसीच्या मागे लागला होता. तिचा वारंवार पाठलाग करत होता. त्या रागातून नियोजनबध्द कट रचून संकेतला फोन करून बोलावले व माळरानावर काळोखात नेऊन चाकूने त्याच्यावर सपासप वार केले.

कोल्हापूर : साळोखेनगर परिसरात कोपार्डेकर हायस्कूलसमोरील माळावर कट करून तरुणावर चाकूने सपासप वार करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला. संकेत सर्जेराव पाटील (वय १९, रा. अपंग गृहनिर्माण सोसायटी, शिवगंगा कॉलनी, साळोखेनगर, कोल्हापूर. मूळ गाव- बस्तवडे, ता. कागल) असे त्याचे नाव आहे. प्रेयसीचा पाठलाग करून तिला वारंवार त्रास दिल्याच्या रागातून शनिवारी मध्यरात्री तिघांनी चाकूने भोसकून हा खून केल्याचे उघड झाले. पोलिसांनी तिघांना अवघ्या काही वेळेत अटक करून खुनाचा उलगडा केला.

शिवराज ऊर्फ दाद्या चंद्रकांत बंडगर (वय २२), प्रतीक विजय कांबळे (१९) व रोहित नामदेव कांबळे (१९, तिघेही रा. वाल्मिकी नगर, आंबेडकर आवास, साळोखेनगर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

संकेत पाटील हा उद्यम नगरात कामाला होता. लहानपणापासून तो शिवगंगा कॉलनीत चुलते दिलीप रंगराव पाटील यांच्याकडेच राहत होता. चुलते माजी सैनिक असून ते मध्यवर्ती एस.टी. स्टॅन्डवर सुरक्षा रक्षक आहेत. शनिवारी दुपारी ते नेहमीप्रमाणे नोकरीवर गेले होते, तर त्याची चुलती पंढरपूर वारीला गेली आहे. सायंकाळी ते संकेतशी फोनवर बोलले. संकेत कामावरून रात्री घरी आला व जेवून घराला कुलूप लावून दुचाकीवरून बाहेर पडला. रविवारी सकाळी माळावर फिरायला गेलेल्या नागरिकांना संकेतचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळला. संकेतला साथीदारांनी माळावर बोलावून धारदार शस्त्रांनी सपासप वार करून जागीच ठार केले.घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, जुना राजवाडाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्यासह पोलिसांनी येऊन परिसराची पाहणी केली. घटनास्थळी त्याच्या वडिलांचा आक्रोश हृदय पिळवटणारा होता. संकेतची आई घरी असते, तर वडील हमिदवाडा साखर कारखान्यात नोकरीस असून मोठा भाऊ नेव्हीत आहे.पोलिसांनी गतीने तपास केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शिवराज बंडगर याला सुभाषनगर ते आर. के. नगर रस्त्यावर, तर प्रतीक कांबळे व रोहित कांबळे या दोघांना जुना राजवाडा पोलीस पथकाने अटक केली.

नियोजनबध्द कट, सपासप केले वार

संकेत हा प्रतीकच्या प्रेयसीच्या मागे लागला होता. तिचा वारंवार पाठलाग करत होता. त्या रागातून प्रतीक, शिवराज आणि रोहित यांनी संगनमताने नियोजनबध्द कट रचून संकेतला फोन करून बोलावले व माळरानावर काळोखात नेऊन, मध्यरात्री तिघांनी एकाच चाकूने त्याच्यावर सपासप वार केले. पोटावर, खांद्यावर आठ ते नऊ खोलवर वार केल्याने मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत टाकून संशयितांनी पलायन केले.

सीसीटीव्ही फुटेज, श्वानाचा मार्गघटनास्थळ परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास संशयित दोघांचा वावर असलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले. पोलीस श्वान पथकानेही वाल्मिकी नगर दिशेने मार्ग दाखवला. त्यातून आरोपींना गजाआड केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPolice Commemoration Dayपोलीस हुतात्मा दिन