शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: त्याने ठेवला लग्नाचा प्रस्ताव, तीन मुले असल्याने तिने दिला नकार; रागातच केले सपासप वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 15:35 IST

राकेशने आपल्यासोबत लग्न करण्याचा तगादा लावला; पण, त्या लग्नाला नकार देत होत्या.

कोल्हापूर : अनैतिक संबंधातून तरुणाने महिलेचा धारदार कोयत्याने गळ्यावर सपासप वार करून निर्घृण खून केल्याची घटना कसबाबावडा लाईन बाजार परिसरात शहाजीनगरात रविवारी घडली. कविता प्रमोद जाधव (वय ४४, रा. कसबा तारळे, ता. राधानगरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. भर मध्यवस्तीत दुपारी घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली.संशयित आरोपी राकेश शामराव संकपाळ (वय ३२, रा. शहाजीनगर) हा स्वत:हून पोलीस मुख्यालयातील ‘एलसीबी’ मध्ये हजर झाला. त्याला पोलिसांनी अटक केली. लग्नास नकार दिल्याने रागाच्या भरात तिचा खून केल्याची कबुली संशयिताने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.घटनास्थळी व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कविता जाधव ही कसबा तारळे येथे राहते. त्यांना दोन मुली व एक मुलगा असून पतीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले आहे. राधानगरी येथे मावसभावाच्या फुटवेअर दुकानात त्या कामास होत्या, शिवणकामही करून उदरनिर्वाह करत होत्या. नात्यातील अविवाहीत राकेश संकपाळ याच्याशी त्यांचे सूत जुळले. दोघांच्या संबधांची नातेवाईकांना कल्पना होती. राकेशने तिला आपल्यासोबत लग्न करण्याचा तगादा लावला; पण, त्या लग्नाला नकार देत होत्या.रविवारी सकाळी संशयित राकेशने आपल्या आई- वडिलांना देवदर्शनाला गावी पाठवले. भाऊ नेहमीप्रमाणे नोकरीला गेला. त्यावेळी कविता ही मावसभावासोबत राकेशच्या घरी आल्या. त्यानंतर भाऊ परत तारळेला निघून गेला. दुपारी राकेशने कविताला पुन्हा लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तिने तीन मुले असल्याने लग्नास नकार दिला, दोघांत वादावादी झाली. रागातच राकेशने घरातील धारदार कोयत्याने तिच्या गळ्यावर व मानेवर सपासप वार केले. त्यात ती जागीच ठार झाली.

घटनेनंतर संशयित आरोपी राकेश संकपाळ स्वत:हून नजीकच्या पोलीस मुख्यालयातील स्थानिक गुन्हे अन्वषेण शाखेच्या कार्यालयात हजर झाला, त्याने खून केल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पो.नि. संजय गोर्ले, सहा.पो.नि. किरण भोसले, शाहुपूरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश गवळी आदींनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाचे दृश्य विदारक होते.

भिंतीवर रक्ताच्या चिळकांड्या

कविता हिच्या गळ्यावर कोयत्याचे सहा तर मानेवर एक वर्मी घाव होता. रक्ताच्या चिळकांड्या खोलीतील भिंतीवर तसेच राकेशच्या कपड्यावर उडल्या होत्या. त्याच अवस्थेत तो पोलिसांत हजर झाला.

मुलीला भेटीला जाण्यासाठी पोळ्या केल्या; पण...कविताची मुलगी महागाव (ता. गडहिंग्लज) येथे व्यावसायिक शिक्षण घेते. तिला भेटायला जाण्यासाठी कविताने रविवारी लवकर उठून पोळ्या केल्या, त्या घेऊन त्या कसबा तारळेतून कोल्हापुरात आल्या. कदाचित कविता व राकेश दोघेही महागावला जाणार होते; पण, तोपर्यंत अनर्थ घडला.

कडी घालून घरातून बाहेर पडला

खून केल्यानंतर मृतदेह तेथेच टाकून घराच्या दरवाजाला कडी लावून तो बाहेर पडला. कडी लावताना त्याच्या हाताचे रक्तही कडीला लागले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस