शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत सामाजिक कार्यकर्त्याचा खून, धारधार हत्याराने घरासमोरच केले वर्मी घाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 12:17 IST

पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याचा संशय

इचलकरंजी : येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश अन्नापा गडगे (वय 55, रा स्वामी अपार्टमेंट, इचलकरंजी) यांचा मंगळवारी रात्री उशिरा राहत्या घरासमोर निर्घृण खून करण्यात आला. त्यांच्या मानेवर चाकू सारख्या धारधार हत्याराने एकच वर्मी घाव बसला असून, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. 

हल्ल्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.याबाबत घटनास्थळ व पोलिसातून मिळालेली माहिती अशी, गडगे हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार निर्मुलन संघटनेचे माजी अध्यक्ष होते, तर भ्रष्टाचार विरोधी जनक्रांती आघाडीचे ते संस्थापक अध्यक्ष होते. तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणूनही ते काम करीत होते. 

मंगळवारी रात्री उशिरा नेहमीच्या सवयीप्रमाणे भटक्या कुत्र्यांना बिस्कीट घालण्यासाठी ते घरासमोर थांबले होते. त्यावेळी अचानक हल्लेखोराने त्यांच्यावर हल्ला केला. चाकू सारख्या धारदार शस्त्राने त्यांच्या मानेवर वार केला. त्यात त्यांना गंभीर इजा झाली. त्यावेळी आरडाओरड ऐकून परिसरात थांबलेले शेजारी त्यांच्या दिशेने आले. त्यामुळे हल्लेखोर पळून गेला. 

घटनास्थळावरील नागरिकांनी त्यांना उपचारासाठी म्हणून आयजीएम रुग्णालयात नेले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैदयकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ही माहिती समजताच घटनास्थळी व आयजीएम रुग्णालयात गर्दी झाली होती. घटनास्थळी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी भेट दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी