शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: खुनातील आरोपी महेश महाराज याची पुन्हा बनवेगिरी, नवरात्रोत्सवात धाराशिवला अनुष्ठान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 13:02 IST

पोलिस चौकशी करणार का?

कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील देवठाणे मठात तरुणीचा खून केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला महेश महाराज सहा महिन्यांनी परतला आहे. नवरात्रोत्सवात नळदुर्ग (जि. धाराशिव) येथील अंबाबाई मंदिरात छातीवर घट बसवून १० दिवस अनुष्ठान करणार असल्याची माहिती त्याने तुळजापूर येथील पत्रकार परिषदेत दिली. तरुणीच्या खुनातील भोंदू महाराज पुन्हा उजळ माथ्याने फिरत असल्याने त्याच्यावर पोलिस काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.एप्रिल २०२४ मध्ये देवठाणे येथील मठात महेश महाराज आणि त्याचा मोठा भाऊ बाळकृष्ण महाराज यांच्यासमोर वैष्णवी लक्ष्मीकांत पोवार (वय २४, रा. शनिवार पेठ, कोल्हापूर) या तरुणीला बेदम मारहाण झाली होती. त्या घटनेत तरुणीचा मृत्यू झाला. गुन्हा दाखल होताच दोन्ही महाराज राज्याबाहेर पळाले होते. मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर यातील महेश महाराज पुन्हा बनवेगिरी करण्यासाठी लोकांसमोर आला आहे.नवरात्रोत्सवात नळदुर्ग येथील मंदिरात छातीवर घट बसवून १० दिवस अनुष्ठान करणार असल्याचे त्याने जाहीर केले. गेल्यावर्षी नवरात्रोत्सवात त्याने श्रीरामपूर (जि. अहमदनगर) येथील मंदिरात असे अनुष्ठान करून लोकांना भुरळ घातली होती. आता पुन्हा तो बनवेगिरी करीत आहे.पोलिसांच्या भूमिकेकडे लक्षगुन्ह्यातील दोन्ही संशयितांचा शोध घेण्यासाठी लक्ष्मीपुरी पोलिसांची पथके सोलापूर, धाराशिव, अहमदनगर, पुणे जिल्ह्यात जाऊन आली होती. दोघेही राज्याबाहेर पळाल्याने पोलिसांनी त्यांचा शोध थांबवला होता. दरम्यान, त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला. बालयोगी महेश्वरानंद महाराज या नावाने पुन्हा चर्चेत आलेल्या महेश महाराजाची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी मृत वैष्णवी पोवार हिच्या नातेवाईकांकडून होत आहे. त्यामुळे पोलिस काय करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसNavratriनवरात्री