शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गोकुळमध्ये मुरलीधर जाधव यांना पुन्हा संधी शक्य, न्यायालयात येत्या बुधवारी निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 11:40 IST

राज्यात सत्तांतर झाल्यावर २१ सप्टेंबर २०२२ च्या आदेशान्वये त्यांचे पद रद्द करण्यात आले

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या शासन नियुक्त संचालकपदी मुरलीधर जाधव यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयात यासंदर्भात येत्या बुधवारी (दि.२५) न्यायमूर्ती के. एच. श्रीराम व राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. बुधवारी (दि.१८) झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने जाधव यांची नियुक्ती रद्द करण्याचा आदेश मागे घेता की आम्ही आदेश द्यायला हवा अशी विचारणा करून सरकारला फटकारले आहे. पुढील सुनावणीपर्यंत नवीन संचालकाची नियुक्ती करू नये, असेही बजावले.गोकुळमध्ये सत्तांतर होऊन सतेज पाटील-हसन मुश्रीफ गटाची सत्ता आल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाधव यांची शासन नियुक्त प्रतिनिधी म्हणून ९ जुलै २०२१ ला नियुक्ती केली. या जागेवर सत्तारूढ गटाला वीरेंद्र मंडलिक यांना संधी द्यायची होती. त्यामुळे जाधव यांना अगोदर महाविकास आघाडीतच संघर्ष करावा लागला. पुढे त्यांना सत्तेत सामावून घेण्यात आले. संचालक मंडळाच्या काही बैठकांना ते उपस्थित राहिले. राज्यात सत्तांतर झाल्यावर २१ सप्टेंबर २०२२ च्या आदेशान्वये त्यांचे पद रद्द करण्यात आले. त्यास त्यांनी २८ सप्टेंबरला उच्च न्यायालयात आव्हान दिले. बुधवारी झालेल्या सुनावणीत सरकारने आम्हांला नेमणुकीचा अधिकार आहे तसा तो ती रद्द करण्याचाही असल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केले. न्यायालयाने त्यास हरकत घेतली. जाधव यांची नियुक्ती निबंधकांनी केली आहे व नियुक्ती रद्दचा आदेश उपसचिवांनी काढला. उपसचिव हे निबंधक आहेत का अशी विचारणा न्यायालयाने केली. ज्या कायद्यानुसार त्यांची नियुक्ती केली त्या कायद्यामध्ये त्यांना काढून टाकण्याची काय तरतूद आहे अशी विचारणा न्यायालयाने केली. सरकारने केलेली नियुक्ती सरकार बदलले म्हणून बदलता येणार नाही अशीही टिप्पणी न्यायालयाने केली. त्यांनी संस्थेच्या हितास बाधा पोहोचवली असल्यास तशी निबंधकांनी त्यांना नोटीस बजावून त्यात त्यांच्यासह गोकुळचेही म्हणणे घ्यायला हवे होते असेही न्यायालयाने म्हटले.

पदासाठी चढाओढमुख्यमंत्री शिंदे गटात आलेले खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र, खासदार धैर्यशील माने गटा़चे झाकीरहुसेन भालदार आणि महाडिक गटाचे तानाजी पाटील यांनी या जागेसाठी ताकद लावली आहे. शिवसेनेतील फुटीनंतर खासदार माने यांच्या बंगल्यावर मुरलीधर जाधव यांनी काढलेला मोर्चा या सगळ्याच्या मुळाशी आहे. त्यामुळे जाधवच राहतात की नव्याला संधी मिळते याबद्दल उत्सुकता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGokul Milkगोकुळ