महापालिकेचा कर्मचारी हेब्बाळ येथे ठार

By Admin | Updated: April 5, 2016 01:34 IST2016-04-05T01:34:53+5:302016-04-05T01:34:53+5:30

अन्य दोघेजण जखमी

The municipal staff killed at Hebal | महापालिकेचा कर्मचारी हेब्बाळ येथे ठार

महापालिकेचा कर्मचारी हेब्बाळ येथे ठार

कोल्हापूर/संकेश्वर: पुणे-बंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने रविवारी (दि. ३) रात्री हेब्बाळ (ता. हुक्केरी) नजीक पीबीरोडवर धडक दिल्याने दुचाकीस्वार धनाजी हिंदुराव शिंदे (वय ४७ रा. खरी कॉर्नर, गांधी मैदान मुख्य प्रवेशद्वार, शिवाजी पेठ) ठार झाले, तर अन्य दोघेजण जखमी झाले.
धनाजी शिंदे हे दिनेश बाबूराव भिलवडीकर (रा. कोल्हापूर) व राजू जोतिबा सुतार (रा. किणे, ता. बेळगाव) हे तिघेजण बजाज प्लॅटिना दुचाकी (एमएच ०९ ३४९०) वरून कोल्हापूरहून बेळगावला जात होते.
शिंदे हे कोल्हापूर महापालिकेत २५ वर्षांपासून नोकरीला होते. शिंदे यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, रविवारी मित्राची आई आजारी असल्यामुळे शिंदे व त्याचे मित्र शिंदेंच्या दुचाकीवरून बेळगांवकडे निघाले होते. रात्रीच्या वेळी हेब्बाळजवळ त्यांच्या दुचाकीला मारुती कार (केए २२ पी ७३२१)ने धडक दिली. त्यात दुचाकीस्वार धनाजी शिंदे जागीच ठार झाले, तर अन्य दोघेही जखमी झाले. संकेश्वर पोलिसांनी घटनास्थळाचा पंंचनामा केला. वाहन परवान्यावरून शिंदे याची ओळख पटली. त्यांनी कोल्हापुरातील खरी कॉर्नर येथील धनाजी शिंदे यांच्या घरी हा प्रकार मोबाईलवरून कळविला. नंतर त्यांचे नातेवाईक संकेश्वरकडे रवाना झाले. सोमवारी दुपारी धनाजी शिंदे यांचा मृतदेह कोल्हापुरात आणला. स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

Web Title: The municipal staff killed at Hebal