महापालिका पथकांची ८२ व्यक्तींवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 05:28 PM2021-04-20T17:28:16+5:302021-04-20T17:35:29+5:30

CoronaVIrus Kolhapur : कोल्हापूर शहरात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८२ नागरिकांवर महापालिकेच्या पथकांनी दंडात्मक कारवाई केली. त्यामध्ये नागरिक, व्यापारी, विक्रेते, दुकानदार यांचा समावेश आहे.

Municipal squads take action against 82 persons | महापालिका पथकांची ८२ व्यक्तींवर कारवाई

महापालिका पथकांची ८२ व्यक्तींवर कारवाई

Next
ठळक मुद्देमहापालिका पथकांची ८२ व्यक्तींवर कारवाईनागरिक, व्यापारी, विक्रेते, दुकानदार यांचा समावेश

कोल्हापूर : शहरात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८२ नागरिकांवर महापालिकेच्या पथकांनी दंडात्मक कारवाई केली. त्यामध्ये नागरिक, व्यापारी, विक्रेते, दुकानदार यांचा समावेश आहे.

शहरात फिरताना मास्कचा वापर अनिवार्य असून सोशल डिस्टन्स राखण्याण्यासह जीवनावश्यक वस्तूंची दुकाने रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवायची आहेत, परंतु या नियमांकडे दुर्लक्ष होत आहे.

शहरात ठिकठिकाणी महापालिकेची पथके अशा नियम तोडणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेऊन आहेत. नियम तोडणाऱ्या ८२ नागरिकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ४६ हजार रुपये दंड वसूल केला.

संचारबंदी असतानाही खरेदीचे कारण सांगून घराबाहेर पडून विनाकारण शहरात फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात अशी चाचणी करण्यात येत आहे. गेल्या सोमवारी कपिलतीर्थ भाजी मंडईत चौदा तर रविवारी लक्ष्मीपुरीतील सहा व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या होत्या. त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. अनेक कोरोनाबाधित शहरातून फिरत आहेत.

सोमवारी मिरजकर तिकटी येथे महापालिका पथकाने काही नागरिकांना अडवून त्यांची सक्तीने रॅपिड ॲन्टिजन चाचणी केली. त्यावेळी सहा नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दोन दिवसांपूर्वी रॅपिड ॲन्टिजन टेस्ट बिंदू चौक व लक्ष्मीपुरी येथे घेण्यात आली. यावेळी ७६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये सहा नागरिक पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्व कोरोनाबाधित नागरिकांना डीओटी सेंटरला व किणी वठार येथील नागरिकाला पारगाव येथील कोविड सेंटरला ठेवण्यात आले आहे.

शहरात गर्दीच्या ठिकाणी कोरोना हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता आहे. म्हणून नागरिकांनी गर्दी टाळावी व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Municipal squads take action against 82 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.