कोरोना लसीकरणात महापालिकेची आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:30 IST2021-09-09T04:30:47+5:302021-09-09T04:30:47+5:30
कोल्हापूर महानगरपालिकेला उपलब्ध होत असलेल्या डोसची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने लसीकरणास वेग आला आहे. ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांचे ...

कोरोना लसीकरणात महापालिकेची आघाडी
कोल्हापूर महानगरपालिकेला उपलब्ध होत असलेल्या डोसची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने लसीकरणास वेग आला आहे. ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांचे ७२ टक्के तर, ६० वर्षांवरील नागरिकांचे ६८ टक्के लसीकरण झाले आहे.
कोल्हापूर शहरात ४ लाख ८८ हजार ५०२ नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी २ लाख २४ हजार ०६२ नागरिकांना ४६ टक्के सरासरीने लसीचा पहिला तर, १ लाख १६ हजार ५९३ नागरिकांना ५२ टक्के सरासरीने दुसरा डोस देण्यात आला आहे. बुधवारी शहरातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर १९९२ नागरिकांना लस दिली गेली.
राज्य सरकारकडून बुधवारी महानगरपालिकेला आणखी २१ हजार १५० डोस उपलब्ध झाले. आज, गुरुवारपासून लसीकरण आणखी गतिमान होईल. लस उपलब्ध आहे, परंतु ८४ दिवसांची अट असल्यामुळे नागरिकांना लस घेता येत नाही. त्यामुळे एकीकडे लस आहे तर, दुसरीकडे पुरेशी लाभार्थी नाहीत अशी परिस्थिती आहे. विशेष म्हणजे महानगरपालिका आरोग्य विभागाने स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत सुद्धा लसीकरण मोहिमेला गती देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ८४ दिवसांची अट थोडी शिथिल केल्यास या मोहिमेला आणखी गती मिळून जास्तीत जास्त नागरिकांना लस मिळेल. यादृष्टीने प्रशासनाने प्रयत्न करावा, अशी सूचना केली जात आहे.