विविध मागण्यांसाठी पालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:17 IST2021-01-08T05:17:58+5:302021-01-08T05:17:58+5:30

सोमवारी सकाळी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी शिवाजी चौकात एकत्र आले. तेथून हनुमान रोड, यादव वाडा, गाव चावडी मार्गे ...

Municipal employees' agitation for various demands | विविध मागण्यांसाठी पालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन

विविध मागण्यांसाठी पालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन

सोमवारी सकाळी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी शिवाजी चौकात एकत्र आले. तेथून हनुमान रोड, यादव वाडा, गाव चावडी मार्गे शांतीनाथ चौक, भाजी मंडप, बौद्ध तक्या मार्गे सिद्धार्थ नगर, कुंभार गल्ली, गांधी चौक मार्गे पालिकेत आले. यावेळी ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. त्यानंतर घोषणा देत बोंब मारत पालिकेसमोर आले. एकच नारा अधिकाऱ्यांना निलंबित करा, मागासवर्गीय कर्मचाऱ्यांशी जातीयवाद करणाऱ्यांचा धिक्कार असो, नोकरी नेमणूक सफाई कामगार चमच्यांना दिला साहेबांचा अधिकार, कंपोस्ट कर्मचारी अधिकारी झालाच कसा याची चौकशी झालीच पाहिजे, आदी जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी संघटक सचिव सुधाकर पिसे यांनी कर्मचाऱ्यांची भूमिका मांडली.

दरम्यान, प्रशासक व आंदोलनकर्ते यांच्यात चर्चा झाली. यामध्ये सुधाकर पिसे, नारायण रसाळ, मुख्याधिकारी सुषमा कोल्हे - शिंदे हे सहभागी झाले. त्यांनी मुकादम नेमण्याचा आदेश निर्गत केल्याचे सांगितले. हा आदेश वेळेवर पोहोच न झाल्यामुळे येथेच देण्यात आला. तर दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासह अन्यत्र काम करण्याऱ्या सफाई कामगारांना मूळ ठिकाणी नेमणूक करावे यावर गुरुवारी प्रशासन व कर्मचारी संघटना यांच्यात चर्चा होणार आहे. यामध्ये निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी गजानन धनवडे, धनाजी पोवार, अमित कांबळे, चेतन कांबळे, अजित पोवार, कालिदास पोवार, कपिल धनवडे, प्रवीण आयरेकर, सिद्धू सलगर आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ओळ :

पेठवडगाव : वडगाव पालिकेच्या वतीने प्रभाग मुकादम नेमत असल्याचे पत्र आंदोलकांना मुख्याधिकारी सुषमा कोल्हे-शिंदे यांच्या हस्ते देताना सुधाकर पिसे, नारायण पिसे, प्रवीण सावंत, आदी उपस्थित होते. (छाया : क्षितिज जाधव)

Web Title: Municipal employees' agitation for various demands