महापालिका निवडणूक प्रक्रियेला येणार गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:23 IST2021-01-23T04:23:56+5:302021-01-23T04:23:56+5:30
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीची प्रक्रिया आता गतिमान होणार आहे. पुढील आठवड्यात आरक्षण, प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब होईल. यानंतर पुढील महिन्यात ...

महापालिका निवडणूक प्रक्रियेला येणार गती
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीची प्रक्रिया आता गतिमान होणार आहे. पुढील आठवड्यात आरक्षण, प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब होईल. यानंतर पुढील महिन्यात प्रारूप मतदार यादीचे काम सुरू केले जाणार असून, मार्चअखेरीस निवडणूक होईल, असा अंदाज महापालिका वर्तुळातून व्यक्त होत आहे.
कोल्हापूर महापालिका सभागृहाची १५ नोव्हेंबर रोजी मुदत संपली असून, कोरोनामुळे प्रशासकराज सुरू आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. आरक्षण, प्रभागरचना जाहीर झाली असून, यावरील सुनावणीही पूर्ण झाली आहे. आता राज्य निवडणूक आयोगाचे प्राधिकृत अधिकारी आरक्षण, रचनेचा अहवाल अभिप्रायसह २७ जानेवारी रोजी राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांकडे सादर करणार आहेत. यानंतर अंतिम आरक्षण, प्रभाग रचनेची अधिसूचना काढली जाणार आहे. पहिला टप्पा पूर्ण होणार असून, दुसरा टप्पा सुरू होणार आहे. यामध्ये प्रारूप मतदार यादी तयार करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यावर हरकती, सुनावणीनंतर अंतिम मतदार यादी होईल. यानंतर निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरू होईल. यावेळी निवडणुकीचा प्रत्यक्ष कार्यक्रम जाहीर केला जाईल. यामध्ये अर्ज दाखल, माघार, चिन्ह वाटप, मतदान आणि निकालाचा समावेश असेल. कोरोनाची स्थिती सध्या आहे तशीच कायम राहिल्यास अथवा कोणताही अडथळा आला नाही, तर मार्चअखेरीस मतदान होऊन एप्रिलच्या अखेरपर्यंत नवीन सभागृह अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.