महापालिकेचे शाहू समाधी स्थळाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:58 IST2020-12-05T04:58:15+5:302020-12-05T04:58:15+5:30

कोल्हापूर महापालिकेने नर्सरी बागेजवळ स्वनिधीतून कोट्यवधी रुपये खर्चून राजर्षी शाहू महाराज यांचे समाधिस्थळ उभारले आहे. काही दिवस कोरोनामुळे येथे ...

Municipal Corporation neglects Shahu Samadhi site | महापालिकेचे शाहू समाधी स्थळाकडे दुर्लक्ष

महापालिकेचे शाहू समाधी स्थळाकडे दुर्लक्ष

कोल्हापूर महापालिकेने नर्सरी बागेजवळ स्वनिधीतून कोट्यवधी रुपये खर्चून राजर्षी शाहू महाराज यांचे समाधिस्थळ उभारले आहे. काही दिवस कोरोनामुळे येथे प्रवेश बंद केला होता. दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून या परिसराकडे दुर्लक्ष झाले. स्मारकाच्या डाव्या बाजूला राजघराण्यातील मंदिर आहेत. यामध्ये महाराणी ताराबाई आणि शिवाजी महाराज यांच्या मंदिराचा समावेश आहे. या मंदिरांना ऐतिहासिक महत्त्व आहे. मंदिरावर झाडे उगवली असून, ती काढलेली नाहीत. यामुळे मंदिरालाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच याच परिसरात चार ते पाच फुटांपर्यंत गवत वाढले असून, त्याची छाटणी केलेली नाही. यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या शाहू समाधी स्मारकाच्या सौंदर्याला बाधा निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया

शाहू समाधी स्मारक परिसर आणि येथील लॉन सुस्थित आहे. राजघराण्यातील मंदिर परिसरात गवत वाढले आहे. मंदिर आणि स्मारक या संपूर्ण परिसराची वार्षिक मेंटनन्स देण्यासाठी प्रस्ताव प्रशासनासमोर ठेवला आहे. मंजुरीनंतर हा कायमचा प्रश्न निकाली निघणार आहे. सध्या मनुष्यबळ कमी असल्यामुळे परिसराची स्वच्छता करण्याची राहिली आहे. लवकरच ती करून घेतली जाईल.

रावसाहेब चव्हाण, उपशहर अभियंता, महापालिका.

फोटो : ०४१२२०२० कोल केएमसी शाहू समाधी स्थळ१

फोटो : ०४१२२०२० कोल केएमसी शाहू समाधी स्थळ२

ओळी : कोल्हापुरातील नर्सरी बागेजवळील राजर्षी शाहू समाधिस्थळ परिसराकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले असून, परिसरातील वाढलेल्या गवताची छाटणी केली नसल्यामुळे चार फुटांवर ते वाढले आहे.

फोटो : ०४१२२०२० कोल केएमसी शाहू समाधी स्थळ३

ओळी : शाहू समाधी स्थळ परिसरतील महाराणी ताराबाई यांच्या मंदिरावर झाडे उगवली आहेत. वेळेवर याची छाटणी केली नसल्यास मंदिरालाच धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

छाया : आदित्य वेल्हाळ

बातमीदार : विनोद

Web Title: Municipal Corporation neglects Shahu Samadhi site

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.