शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्थांची मे मध्ये निवडणूक शक्य, राज्य सरकारच्या हालचाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 15:56 IST

तीन वेळा केलेली तयारी पाण्यात; पक्ष पातळीवर तयारीसाठी जोर, बैठका

कोल्हापूर : गेल्या चार-पाच वर्षापासून स्थानिक स्वराज संस्थांवर असलेली प्रशासक राजवट आता काही महिन्यापर्यंतच राहील. या संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना सज्जतेचे आवाहन केल्यामुळे या निवडणुका आता फार काळ रखडत ठेवल्या जाऊ नयेत, ही राज्य सरकारची मानसिकता समोर आली आहे.राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका गेल्या चार-पाच वर्षापासून खोळंबल्या आहेत. सर्वच संस्थांचा कारभार दीर्घकाळ प्रशासकांच्या हाती राहिला असल्याने राज्यातील विकासाची घडी पूर्णपणे विस्कटलेली आहे. सुरू असणाऱ्या विकास कामांवर कोणाचे लक्ष नाही. त्यामुळे नवीन विकास सोडाच नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्नांचीही वेळेवर निर्गत होत नसल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे या संस्थांच्या निवडणुका घेऊन तेथील कारभार लोकप्रतिनिधींच्या हाती सोपविणे आवश्यक आहे.शिर्डी येथे झालेल्या भाजपच्या अधिवेशनात गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज संस्था भाजपच्या ताब्यात ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन केले. फडणवीस यांनी तर पुढील तीन-चार महिन्यात या निवडणुका होतील, असे सांगून टाकल्याने या निवडणुका एप्रिल किंवा मे महिन्यात होतील, असे तर्क लढविले जाऊ लागले आहेत.

  • २२ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी
  • याच सुनावणीवेळी निवडणूक आयोग बाजू मांडण्याची शक्यता
  • सुनावणीत ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्याची शिफारस होऊ शकते
  • सर्वोच्च न्यायालय देखील २२ जानेवारीला अंतिम निर्णय देण्याची शक्यता

तीन वेळा केलेली तयारी पाण्यातकोल्हापूर महानगरपालिका सभागृहाची मुदत नोव्हेंबर २०२० मध्ये संपली. त्याच्या आधीपासून आतापर्यंत तीन वेळा प्रभाग रचना, आरक्षण, अंतिम मतदार यादी अशी जय्यत तयारी करण्यात आली होती. प्रभाग रचना तर रात्र रात्रभर जागून तयार केली होती. परंतु ही सर्व तयारी पाण्यात गेली. आता निवडणूक घेण्याचा निर्णय झाला तर अशी चौथ्यांदा तयारी केली जाईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदElectionनिवडणूक 2024Governmentसरकार