सातव्या आर्थिक गणनेसाठी महापालिका, नगरपालिकांनी सहकार्य करावे - निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:22 IST2021-01-08T05:22:55+5:302021-01-08T05:22:55+5:30
कोल्हापूर : सध्या जिल्ह्यात सातवी आर्थिक गणना २०१९ चे काम चालू असून महापालिका, पालिका क्षेत्रांमध्ये नागरिक माहिती देण्यास नकार ...

सातव्या आर्थिक गणनेसाठी महापालिका, नगरपालिकांनी सहकार्य करावे - निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे
कोल्हापूर : सध्या जिल्ह्यात सातवी आर्थिक गणना २०१९ चे काम चालू असून महापालिका, पालिका क्षेत्रांमध्ये नागरिक माहिती देण्यास नकार देत असल्याने समस्या निर्माण होत आहेत. अशा ठिकाणी महापालिका, नगरपालिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी गुरुवारी केले.
जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या वतीने या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहूजी सभागृहात आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी विजय पोवार, पोलीस उपअधीक्षक (गृह) सुनीता नाशिककर उपस्थित होत्या.
जिल्हा सांख्यिकी अधिकारी सायली देवस्थळी यांनी प्रास्ताविकात माहिती दिली. २५ नोव्हेंबर २०२०पर्यंतच्या आकडेवारीनुसार सहावी आर्थिक गणना व सातव्या आर्थिक गणनेमध्ये संकलित केलेल्या माहितीची तुलना केली असता एकूण एक हजार २२२ गावांपैकी ३६४ गावांची उद्योग नोंदणी सहाव्या आर्थिक गणनेपेक्षा जास्त झाली असून ८२७ गावांमध्ये उद्योगांची नोंदणी कमी झाली आहे. महापालिका क्षेत्रात नागरिक माहिती देण्यास नकार देत असल्याने काही ठिकाणी समस्या निर्माण होत आहेत. तरी महापालिका, नगरपालिकांमधील संबंधित अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे, अशी सूचना गलांडे यांनी दिली.
..................