महापालिका भरणार फायरमनची १० पदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 15:34 IST2020-07-17T15:32:52+5:302020-07-17T15:34:39+5:30
कोल्हापूर महानगरपालिका अग्निशमन दलाकडे ठोक मानधनावर फायरमनची १० पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

महापालिका भरणार फायरमनची १० पदे
कोल्हापूर : महानगरपालिका अग्निशमन दलाकडे ठोक मानधनावर फायरमनची १० पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
कोणत्याही संकटाच्या काळी तत्काळ घटनास्थळी धाव घेणाऱ्या अग्निशमन दलाला कर्मचाऱ्यांची वानवा आहे. या विभागाकडे प्रत्यक्षात ४० पदे रिक्त आहेत. तसा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता; परंतु सध्याची महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता एवढी पदे भरणे अशक्य आहे, म्हणून केवळ १० फायरमन भरण्यास अनुमती मिळाली आहे.
या फायरमनचे काम जोखमीचे असूनही त्यांना केवळ १० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. या महिन्याअखेरीस ही पदे भरली जातील, असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.