शहरं
Join us  
Trending Stories
1
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
2
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
3
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
4
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
5
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
6
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
7
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
8
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
9
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
10
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
11
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
12
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
13
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
14
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
15
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
16
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
18
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?
19
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
20
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला

मुंबई महापालिका स्वबळावरच लढविणार, राज ठाकरेंची कोल्हापुरात घोषणा; राज्यपालांवर खोचक टिप्पणी

By भीमगोंड देसाई | Published: November 29, 2022 7:48 PM

महाराष्ट्राचे मूळ प्रश्न चव्हाट्यावर येवू नयेत, त्याबद्दल सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारू नये म्हणून सीमा प्रश्नाचा विषय उकरून काढला जात आहे.

कोल्हापूर : कोणी काहीही शितोंडे उडवले तरी मी कोणासाठीही काम करीत नाही. महाराष्ट्र आणि माझ्या पक्षासाठी काम करतो. पक्षाच्या बळकटीकरणासाठी विभागनिहाय दौरे सुरू आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूकही स्वबळावर लढविणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केली.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या छत्रपती शिवरायांच्याबध्दलच्या क्तव्याबद्दल राज ठाकरे यांनी काही लोकांना पद मिळाले पण पोच आली नाही, अशी खोचक टिप्पणी केली. राज्यात मंत्री असलेला एकजण महिला नेत्यांबद्दल वारंवार अपशब्द वापरतो, सांगलीतील एक भंपक आमदार असेच काहीतरी बरळत असतो. इतकी सद्याच्या राजकारणाची पातळी घसरली आहे. अशा लोकांना इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी प्रसिध्दी देणे बंद केले पाहिजे, असाही सल्लाही त्यांनी दिला.ठाकरे म्हणाले, पक्षाच्या स्थापनेपासूनचा अभ्यास केल्यास ९८ टक्के लोक आता मनसेत नवीन आहेत. मनसेही प्रस्थापितांविरोधात लढण्याची रणनीती करीत आहे. पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी, काँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी तोही हालत असतो. मनसेने १९९५ आणि १९९९ साली अनेकांचे बालेकिल्ले हलवले होते. मुंबईतील जाहीर सभेत मी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रकृतीची नव्हे तरी त्यांच्या प्रवृत्तीची चेष्टा केली होती. ते मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानंतरच सर्वांना भेटत आहेत. पदावर असताना का भेटत नव्हते, त्यावेळी आजारपणाचे कारण पुढे करून आता फुटलेल्या आमदारांनाही ते भेटले नव्हते, ही वस्तूस्थिती आहे.

सीमाप्रश्न आताच का ?महाराष्ट्राचे मूळ प्रश्न चव्हाट्यावर येवू नयेत, त्याबद्दल सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारू नये म्हणून सीमा प्रश्नाचा विषय उकरून काढला जात आहे. राज्यपाल कोश्यारीही यासाठीच वक्तव्य करतात का ? याचाही शोध घेण्याची गरज आहे, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले. आताच सीमाप्रश्न उकरून काढणारे आणि कोश्यारी यांना कोणीतही स्क्रिप्ट देत असतील. त्यावरून ते बोलत असावेत, असा आरोप त्यांनी केला.

पूर्वीही जात होती पण...पूर्वीही जात होती. पण आता दुसऱ्या जातींबद्दल व्देष पसरवला जात आहे. स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात हे प्रयत्न होत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेMumbaiमुंबईElectionनिवडणूकbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी