शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
4
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
5
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदसेनेच्या नेत्यावर बंदूक
6
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
7
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
8
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
9
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
10
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
11
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
12
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
13
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
14
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
15
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
16
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
17
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
18
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
19
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
20
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी

गांजाचा धूर.. 'उडता कोल्हापूर'; साताऱ्यातील गांजाचे मुंबई कनेक्शन

By उद्धव गोडसे | Updated: January 24, 2025 18:16 IST

कोल्हापूर : कोल्हापुरात पकडलेल्या गांजा तस्करांचे मुंबई कनेक्शन पोलिसांच्या तपासात समोर आले. मुंबईतील एका व्यक्तीकडून सुमारे १०० किलो गांजा आणल्याचे ...

कोल्हापूर : कोल्हापुरात पकडलेल्या गांजा तस्करांचे मुंबई कनेक्शन पोलिसांच्या तपासात समोर आले. मुंबईतील एका व्यक्तीकडून सुमारे १०० किलो गांजा आणल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार मुंबईतील पुरवठारादाच्या शोधासाठी लवकरच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक रवाना होणार आहे. अटकेतील तिघांना गुरुवारी (दि. २३) न्यायालयात हजर केले. त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. दरम्यान, पोत्याने गांजा सापडत असल्याने जिल्ह्यातील त्याचा वाढता वापर स्पष्ट झाला आहे.गोव्यातील सॅम नावाच्या व्यक्तीला १० किलो गांजा विकण्यासाठी निघालेला फैय्याज अली मोकाशी (वय ३७, रा. मलकापूर, ता. कऱ्हाड, जि. सातारा) हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या हाती लागला. त्याच्या चौकशीतून गांजा तस्करांच्या टोळीचा छडा लागला. मोकाशी याच्यासह सोहेल सलीम मोमीन (३३, रा. उंब्रज, जि. सातारा) आणि समीर ऊर्फ तौसिफ रमजान शेख (२१, रा. रहिमतपूर कोरेगाव, जि. सातारा) या तिघांकडून ९१ किलो गांजा जप्त केल्यानंतर पोलिसांनी तस्करांची साखळी उद्ध्वस्त करण्यासाठी पावले उचलली आहेत.

रहिमतपूर येथील समीर शेख याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने मुंबईतून गांजा आणल्याची माहिती मिळाली. त्याने मुंबईतील एका व्यक्तीने चार महिन्यांपूर्वी गांजा आणला होता. त्याची विक्री झाल्यानंतर पुन्हा १०० किलो गांजा आणला. त्यातील १० किलो गांजा गोव्याला पाठवला जात होता.

प्रथमच मोठा माल मिळालाकोल्हापुरात प्रथमच तब्बल ९१ किलो गांजा पोलिसांच्या हाती लागला. यापूर्वी एकाचवेळी ४० किलोपर्यंत गांजा पोलिसांनी पकडला होता. मोठ्या कारवाईमुळे गांजा तस्करीला आळा बसेल, अशा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.तरुणाईला गांजाची झिंगदारू, कोकेन, चरस, एमडी ड्रग्जच्या तुलनेत गांजा स्वस्त आहे. तो सहज उपलब्ध होतो. खिशात पुडी घेऊनही फिरता येते. दीर्घकाळ नशा टिकून राहते. यामुळे गांजाचा वापर वाढल्याचे दिसत आहे. महाविद्यालयीन तरुण आणि मजुरांकडून याचा वापर वाढल्याने मागणी वाढली आहे. काही तरुणीदेखील गांजाच्या आहारी गेल्याचे दिसत आहे.उद्यानांमध्ये नशेबाजांची टोळकीशहरातील बहुतांश उद्याने, मैदाने, पंचगंगा नदी घाट, शेंडा पार्क, गिरगाव रोड, कंदलगाव रोड, चित्रनगरी परिसरातील झुडपांच्या आडोशाला नशेबाजांचे अड्डे आहेत. नशेबाजांमुळे नागरिकांना उद्यानांमध्ये फिरणे मुश्कील बनले आहे. कोणी हटकले तर ते थेट अंगावर धावून जातात.गुन्हेगारीत वाढगेल्या वर्षभरातील झालेल्या गंभीर गुन्ह्यांमधील बहुतांश आरोपी गांजाच्या नशेत होते. हुतात्मा पार्क येथे गांजा ओढणाऱ्यांना हटकल्यानेच टोळक्याने एका व्यक्तीचे शिर कापून ओढ्यात टाकले. रंकाळा चौपाटीवर रावण टोळीच्या म्होरक्याचा खून करणारे तरुणही गांजाच्या नशेत होते. गांजामुळे गुन्हेगारीत वाढ होत असल्याचे दिसत आहे.आता क्विंटलमध्येयापूर्वी गांजा ग्रॅममध्ये सापडत होता. तो आता क्विंटलमध्ये सापडू लागला आहे. याचा अर्थच त्याची लागण राजरोसपणे सुरू आहे. त्याचा वापरही वाढल्याने मागणी वाढली त्यामुळेच त्याचा पुरवठा ग्रॅमवरून क्विंटलवर गेला आहे.

मुंबई ते गोवा व्हाया कोल्हापूर अशी होणारी गांजाची तस्करी रोखण्यासाठी मुंबईतील पुरवठादाराचा शोध सुरू केला आहे. लवकरच त्याला अटक करून तस्करांची साखळी उद्ध्वस्त करू. - रवींद्र कळमकर, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस