मुहूर्तालाच जमला १०० किलो ई-कचरा

By Admin | Updated: June 6, 2014 01:39 IST2014-06-06T01:30:37+5:302014-06-06T01:39:30+5:30

ई-कचरा निर्मूूलन अभियान सुरू : दर ५ तारखेला विभागीय कार्यालयात उपलब्ध

Muhurtla gathered 100 kg of e-waste | मुहूर्तालाच जमला १०० किलो ई-कचरा

मुहूर्तालाच जमला १०० किलो ई-कचरा

कोल्हापूर : महापालिका स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांच्या पुढाकाराने पर्यावरणीय आरोग्यास घातक ठरणार्‍या ई-कचरा निर्मूलन अभियानाची आज, गुरुवारपासून सुरुवात झाली. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेच्या चौकात महापौैर सुनीता राऊत यांच्या हस्ते ‘ई-डस्टबिन’चे अनावरण क रण्यात आले. दिवसभरात १०० किलो ई-कचरा नागरिकांनी आणून दिला. दर महिन्याच्या ५ तारखेला हे ई-डस्टबिन महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयात ठेवण्यात येणार आहेत.
शहरात वर्षाला पाच हजार टनांहून अधिक निर्माण होणार्‍या या ई-कचर्‍याच्या विल्हेवाटीचा यक्षप्र्रश्न महापालिकेसमोर आहे. ई-कचर्‍याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट न लावल्यास यातून पर्यावरणात घातक असे विषारी वायू पसरतात. खराब झालेल्या सीडी, वायर्स, टी. व्ही., कॉम्प्युटर, ए. सी., फ्रिज, मोबाईल, आदी वस्तू या ई-डस्टबिनमध्ये नागरिकांनी टाकाव्यात. याची महालक्ष्मी ई-रिसायकल्सच्या सहयोगाने शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाईल, अशी माहिती सचिन चव्हाण यांनी दिली.
यावेळी उपमहापौर मोहन गोंजारे, महिला व बालकल्याण सभापती रोहिणी काटे, नगरसेवक चंद्रकांत घाटगे, संजय मोहिते, शारंगधर देशमुख, उपायुक्त संजय हेरवाडे, सहायक आयुक्त उमेश रणदिवे, मनोज मेहता, आदी उपस्थित होते.

Web Title: Muhurtla gathered 100 kg of e-waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.