लोकमत न्यूज नेटवर्क
बाजारभोगाव : पन्हाळा तालुक्यातील पडसाळी येथे डोंगरात गगनबावडा व पन्हाळ्याच्या हद्दीवर दुर्लक्षित मुडागड आहे. त्याचे अर्धवट असणारे बांधकाम झाडाझुडपांच्या विळख्यात झाकोळले आहे. निसर्गरम्य परिसर, जवळच असणारा पडसाळी लघुपाटबंधारे तलाव, जवळच असणारा गगनगिरी व त्यालगत असणारे कोकणाकडील विलोभणीय दृश्य यामुळे पर्यटकांना मुडागड आकर्षित करीत आहे. या गडाच्या बांधकाम झाडा - झुडापांनी झाकोळले आहे. हा दुर्लक्षित गड पाहण्यासाठी राज्यभरातून शेकडो शिवभक्त, गड-किल्ले प्रेमी व पर्यटक येत असतात. मात्र, सोयी-सुविधांच्या अभावामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या परिसराचे ऐतिहासिक महत्त्व जाणून पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यास परिसरातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. जमा होणाऱ्या कराच्या माध्यमातून विकासाला गती मिळणार आहे. याशिवाय स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
म्हणूनच वनविभागामार्फत मुडागड व पडसाळी लघुपाटबंधारे तलाव परिसराचा विकास आराखडा तयार करून मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. तेथील जंगलातील पायवाटांवर दगडी बांधकाम करण्यात येणार आहे. निसर्गाला हानी न पोहोचविता विकास करण्यावर भर दिला जाणार आहे. पडसाळी तलावाच्या सभोवतालच्या पायवाटांचा विकास केला जाणार आहे. पर्यटकांना पदभ्रमंतीचा आनंद लुटता येणार आहे. हा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती मानवाड वनपाल कार्यालयाच्या वनपाल स्मिता डाके यांनी ‘लोकमतशी’शी बोलताना दिली.
पन्हाळा तालुक्यातील पडसाळी येथे गगनबावडा व पन्हाळ्याच्या हद्दीवर दुर्लक्षित मुडागड आहे. त्याचे अर्धवट असणारे बांधकाम झाडाझुडपांच्या विळख्यात झाकोळले आहे. निसर्गरम्य परिसर, जवळच असणारा पडसाळी लघुपाटबंधारे तलाव, जवळच असणारा गगनगिरी व त्यालगत असणारे कोकणाकडील विलोभणीय दृश्य यामुळे पर्यटकांना आकर्षित करीत आहे. हा दुर्लक्षित गड पाहण्यासाठी राज्यभरातून शेकडो शिवभक्त , गड-किल्लेप्रेमी व पर्यटक येत असतात. मात्र सोयी-सुविधांच्या अभावामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. या परिसराचे ऐतिहासिक महत्त्व जाणून पर्यटनदृष्ट्या विकास झाल्यास परिसरातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. जमा होणाऱ्या कराच्या माध्यमातून विकासाला गती मिळणार आहे. याशिवाय स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
१)चौकट
मुडागडचा विकास झाल्यास एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून पडसाळी तलाव व छत्रपती शाहू महाराज ही पर्यटन स्थळे म्हणून विकसित होऊन स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होण्यास मदत होईल.
- प्रकाश पाटील
सामाजिक कार्यकर्ते, कोलीक पैकी चाफेवाडी