शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा शॉक; तीन वर्षांत १०० जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:45 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गेल्या तीन वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात विद्युत अपघातामुळे तब्बल शंभर जणांचा बळी गेला ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : गेल्या तीन वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात विद्युत अपघातामुळे तब्बल शंभर जणांचा बळी गेला आहे. यापैकी वीस अपघातामध्येच महावितरण जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी सातजणांना आर्थिक मदत महावितरणकडून मिळाली आहे. विशेष म्हणजे केवळ ६१ अहवाल विद्युत निरीक्षकांचे आलेले आहेत. विजेच्या धक्क्याने ६५ प्राण्यांनाही जीव गमवावा लागला आहे.

विजेच्या धक्क्याने अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. शेतात व घरगुती वीज धक्क्याच्या घटना आपण रोज पाहतो. विजेच्या धक्क्यात केवळ मनुष्यहानी होते असे नाही तर पशुहानी व पिकांचे नुकसानही मोठ्या प्रमाणात होते. गेल्या तीन वर्षांत विजेच्या धक्क्याने शंभर जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील ६१ जणांचे अहवाल विद्युत निरीक्षकाकडून आले आहेत. त्यापैकी ४१ प्रकरणात महावितरण जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले असून, सात जणांनाच २६ लाखांची आर्थिक मदत मिळाली आहे.

तीन वर्षांचा आढावा घेतला तर सरासरी २२ अपघात हे प्राण्याचे झाले आहेत. यापैकी ४५ प्रकरणांचे अहवाल महावितरणकडे प्राप्त झाले असून, ३९ प्रकरणात महावितरण जबाबदार आहे. आठ प्रकरणात तीन लाख ६ हजार रुपयांची मदत संबंधित पशुपालकाला मिळालेली आहे. शॉर्टसर्किटमुळे उभ्या पिकांना आगी लागण्याचे प्रकारही अनेक ठिकाणी घडतात. गेल्या तीन वर्षांत २२६ ठिकाणी पिकांना आगी लागल्या आहेत. यापैकी १४१ ठिकाणी महावितरण जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, अद्याप एकाही शेतकऱ्याला मदत मिळू शकलेले नाही.

भरपाई मिळण्याची प्रक्रिया अशी -

महावितरणचे विद्युत निरीक्षक घटनास्थळ जाऊन पाहणी करतात. घटनेचा अहवाल तयार करून ते महावितरणला सादर करतात. त्यानंतर संबंधित व्यक्तीने पंचनामा, व्यक्ती अथवा प्राण्याच्या शवविच्छेदन अहवालासह महावितरणकडे प्रस्ताव सादर करायचा आहे. त्याची छाननी होऊन यामध्ये महावितरण जबाबदार असेल तरच भरपाई मिळते.

३७ जणांकडून अर्ज अप्राप्त

व्यक्ती, जनावरांसह पिकाच्या नुकसानीबाबत शंभरपैकी ३७ जणांनी महावितरणकडे प्रस्तावच दाखल केलेला नाही. विशेष म्हणजे विद्युत निरीक्षकाच्या अहवालावरच भरपाईचे भवितव्य अवलंबून असते.

गेल्या तीन वर्षांतील विजेच्या धक्क्याच्या घटना

वर्ष व्यक्ती प्राणी पिके

२०१८-१९ ४१ २१ १०१

२०१९-२० ३४ २२ ९३

२०२०-२१ २५ २२ ३२