शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
2
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
3
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
4
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
5
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
6
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
7
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
8
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
9
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
10
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
11
लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
12
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
13
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
14
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
15
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
16
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
17
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
18
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
19
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
20
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना

एप्रिलपासून एकही बिल न भरणाऱ्यांची वीज तोडणार, तीन आठवड्यांची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 11:25 IST

एप्रिलपासून गेल्या दहा महिन्यांत एकही बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा पुढील तीन आठवड्यांत वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश mahavitaran Kolhapur- महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले आहेत. याचा झटका पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १४ लाख २९ हजार ८११ ग्राहकांना बसणार आहे. थकबाकी भरण्यासाठी हप्त्याची सोय उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देएप्रिलपासून एकही बिल न भरणाऱ्यांची वीज तोडणार, तीन आठवड्यांची मुदत पश्चिम महाराष्ट्रातील १४ लाख ग्राहकांना महावितरणला झटका

कोल्हापूर : एप्रिलपासून गेल्या दहा महिन्यांत एकही बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा पुढील तीन आठवड्यांत वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले आहेत. याचा झटका पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील १४ लाख २९ हजार ८११ ग्राहकांना बसणार आहे. थकबाकी भरण्यासाठी हप्त्याची सोय उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.पश्चिम महाराष्ट्रामध्ये वीज बिलांच्या थकबाकीसह इतर मुद्द्यांचा आढावा घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाली. यावेळी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांच्यासह पाचही जिल्ह्यांतील अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.जिल्ह्यांमध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे एकूण १९६२ कोटी २७ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी १२४७ कोटी ४९ लाख रुपयांची थकबाकी असणाऱ्या १४ लाख २९ हजार ८११ वीजग्राहकांनी गेल्या १ एप्रिल २०२० पासून एकाही महिन्याचे वीज बिल भरलेले नाही. महावितरणकडून वारंवार प्रत्यक्ष संपर्क साधूनदेखील ग्राहकांनी थकबाकीचा भरणा केलेला नाही. त्यामुळे हे पाऊल उचलले असल्याचे नाळे यांनी सांगितले.पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे व कंसात थकबाकी

  • पुणे (१०३२.८० कोटी)
  • सातारा (१४०.३६कोटी)
  • सोलापूर (२५९.१२ कोटी)
  • सांगली (१९२.५४ कोटी)
  • कोल्हापूर (३३७.४३ कोटी) 

एकदाही बिल न भरलेले ग्राहक

ग्राहक प्रकार                संख्या                                       थकबाकी

घरगुती                    १२ लाख ६८ हजार                ४८७ ८५६ कोटी ८१ लाखवाणीज्यीक             १ लाख ३८ हजार ८७०            २६४ कोटी ३२ लाखऔद्योगिक                    २२ हजार ४५४                   १२६ कोटी ३५ लाख

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर