शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

चाचणी होऊनही एमपीएससीच्या उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा, विद्यार्थी संतप्त 

By संदीप आडनाईक | Updated: June 26, 2023 16:10 IST

पूर्व, मुख्य परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना पात्र ठरविण्याची मागणी

संदीप आडनाईककोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गतवर्षी घेतलेल्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण आणि पात्र ठरलेल्या उमेदवारांची दोन वेळा पुन्हा दहा मिनिटांची कौशल्य चाचणी घेऊनही अद्याप अंतिम निकाल न केल्याने परीक्षार्थी संतप्त झाले आहेत. या निकालाच्या प्रतीक्षेसोबतच सर्वच विद्यार्थ्यांना पात्र ठरवा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र गट क सेवा संवर्गातील लिपिक टंकलेखक आणि कर सहायक या पदाच्या भरती प्रक्रियेत लिपिक टंकलेखक पदाच्या ११६४ आणि कर सहायक पदाच्या २८५ जागांसाठी २०११ मध्ये आयोगाने जाहिरात दिली होती. ३ एप्रिल २०२२ रोजी पूर्व परीक्षा घेतल्यानंतर परीक्षेतील पात्रताधारक उमेदवारांची मुख्य परीक्षा ऑगस्ट महिन्यात घेतली. ७ डिसेंबर रोजी या मुख्य परीक्षेचा निकालही जाहीर केला, मात्र टंकलेखन चाचणीचा खोडा घालून आयोगाने या उमेदवारांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला. तरीही उमेदवारांनी या वर्षी ७ एप्रिल रोजी मुंबईत कौशल्य चाचणी दिली. मात्र, अनेक तांत्रिक चुकांमुळे ही चाचणी पुन्हा ३१ मे रोजी आयोगाला घ्यावी लागली. या चाचणीतही पूर्वीपेक्षा अधिक त्रुटी झाल्याचा आरोप उमेदवारांनी केला. आता ही चाचणी होऊनही २५ दिवस उलटले तरीही आयोगाने निकाल जाहीर केलेला नाही. यामुळे उमेदवार संतप्त झाले आहेत. २०२१ च्या परीक्षेपासून प्रथमच ही कौशल्य चाचणी सुरू करून आयोग विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळत आहे. पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नियुक्त्या जाहीर न झाल्याने उमेदवारांना मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे. सिसॅटनुसार कौशल्य चाचणीचे मूल्यांकन ३३ टक्के मान्य करुन त्याआधारे तत्काळ निकाल जाहीर करावा, अन्यथा सर्वच उमेदवारांना पात्र करावे, अशी मागणी ते करत आहेत.दुसरी चाचणीही वादातलोकसेवा आयोगाने टंकलेखनाचा उतारा जाहिरातीत दिलेल्या निकषांपेक्षा मोठा दिला. टायपिंग प्रमाणपत्र जीसीसी, टीबीसीच्या अर्हतेपेक्षा दहा मिनिटांत २५० शब्दांचा अवाढव्य उतारा दिला. आयोगाने कीबोर्ड लेआउट, आयएसएम रेमिंग्टन मराठीचे सांगितले असतानाही रेमिंग्टन गेल हा हिंदी लेआउट दिल्याची उमेदवारांची तक्रार आहे. ऑटो स्क्रोल बंद केल्यामुळे उमेदवारांना उतारा स्वत: स्क्रोल करावा लागत होता. तसेच टायपिंग करताना शब्द हायलाईट करण्याची सोय नव्हती, त्यामुळेही संभ्रम निर्माण झाला. यासंदर्भात या दुसऱ्या चाचणीसंदर्भातही अनेक उमेदवारांनी हरकती आयोगाकडे नोंदविल्या आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMPSC examएमपीएससी परीक्षा