खासदार धैर्यशील माने यांनी साधला पूरग्रस्तांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:27 IST2021-07-30T04:27:15+5:302021-07-30T04:27:15+5:30

पेठ वडगाव-आष्टादरम्यान रस्ता रुंदीकरण करून नव्याने रस्ता केला आहे. या रस्त्यांची उंची वाढविण्यात आल्यामुळे भादोले परिसरातील शेतात पुराचे पाणी ...

MP Dhairyashil Mane interacted with the flood victims | खासदार धैर्यशील माने यांनी साधला पूरग्रस्तांशी संवाद

खासदार धैर्यशील माने यांनी साधला पूरग्रस्तांशी संवाद

पेठ वडगाव-आष्टादरम्यान रस्ता रुंदीकरण करून नव्याने रस्ता केला आहे. या रस्त्यांची उंची वाढविण्यात आल्यामुळे भादोले परिसरातील शेतात पुराचे पाणी तुंबून राहिले. याबाबत खासदार माने यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी महापुराने झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करावे. महसूल विभागाने जागेवर जाऊन पारदर्शक पंचनामे करण्यात यावे अशा सूचना तलाठी यांना केल्या.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत पाटील, हर्षवर्धन माने, चंद्रकात माने, अमर पाटील, रणजित माने, विक्रम माने, शंतनू जामदार, तलाठी तुषार भोसले, बांधकाम विभागाचे तानाजी पाटील, ग्रामसेवक शामसुंदर मुसळे, राहुल पाटील, ओंकार कोळी, कुमार पाटील, सुवर्णा पाटील, सुवर्णा धनवडे आदीसह शेतकरी उपस्थित होते.

फोटो भादोले- भादोले येथे पुराच्या पाण्याने झालेल्या शेतीच्या नुकसानीची माहिती घेताना खासदार धैर्यशील माने व उपस्थित शेतकरी.

Web Title: MP Dhairyashil Mane interacted with the flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.