शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

धैर्यशील मानेंनी घेतला सतेज पाटील यांचा धसका, जाहीर कार्यक्रमात म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 15:50 IST

जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची ताकद मोठी

कोल्हापूर : काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे शिरोळ तालुक्यावर विशेष लक्ष आहे, त्यांची कळ काढून चालत नसल्याचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी निमशिरगाव येथील जाहीर कार्यक्रमात सांगितले. यावरून खासदार माने यांनी सतेज पाटील यांचा धसका घेतल्याची चर्चा बुधवारी दिवसभर सोशल मीडियात सुरू होती.जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांची ताकद मोठी आहे. सर्व तालुक्यांत त्यांचे गट असल्याने जय-पराजयाचे गणित ते बिघडवू शकतात. अलीकडील पाच वर्षांत त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर चांगलीच पकड निर्माण केल्याने त्यांना अंगावर घेणे सर्वपक्षीय नेते टाळतात. मंगळवारी, निमशिरगाव येथे डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या पुतळ्याचे अनावरण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले. महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबरच महायुतीचे नेतेही उपस्थित राहिल्याने फटकेबाजी ऐकायला मिळणार हे निश्चित होते.खासदार माने यांनी शरद पवार यांची स्तुती करतानाच सतेज पाटील यांच्याबाबतही वक्तव्य केले. सतेज पाटील यांचे शिरोळ तालुक्यावर विशेष लक्ष आहे. त्यांची कळ काढून चालत नाही, असे विधान केले. सतेज पाटील यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ‘आमचं ठरलयं’ असे जाहीर करून संजय मंडलिक यांना विजयी केले. शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांच्या कोल्हापूर दौऱ्यात त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावून आगामी निवडणुकीची दिशा स्पष्ट केली. याची धास्ती खासदार माने यांनी घेतल्याची चर्चा सोशल मीडियात सुरू होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणElectionनिवडणूकSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील