शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: फिल्मी स्टाइल दादागिरी अन् पाठलाग करून केला वार, महिलांसह तिघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 12:54 IST

लक्ष्मीपुरी पोलिस आणि नागरिकांनी पाठलाग करून हल्लेखोरास पकडले

कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील मटण मार्केट परिसरात कुऱ्हाड फिरवत दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या हल्ल्यात दोन महिलांसह तिघे जखमी झाले. लक्ष्मीपुरी पोलिसांसह नागरिकांनी पाठलाग करून हल्लेखोर आरबाज बागवान (रा. लक्षतीर्थ वसाहत) याला पकडले. हा थरारक प्रकार मंगळवारी (दि. १८) रात्री दहाच्या सुमारास घडला.याबाबत अर्चना सचिन साळी (वय ४०, रा. विक्रमनगर, कोल्हापूर) यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. साळी यांच्यासह सचिन बाळासो साळी आणि अश्विनी अजित मोहिते (सर्व रा. विक्रमनगर) हे जखमी झाले.लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन साळी हे पत्नी आणि नातेवाईक महिलेसह सिनेमा पाहण्यासाठी लक्ष्मीपुरीत आले होते. सिनेमा संपल्यानंतर साडेनऊच्या सुमारास ते मटण मार्केट परिसरातील एका हॉटेलमधून जेवणाचे पार्सल घेण्यासाठी गेले. रस्त्याकडेला कार पार्क करून हॉटेलमध्ये गेले असता, कुऱ्हाड नाचवत दहशत माजवणारा आरबाज बागवान कारचा दरवाजा उघडून कारमध्ये बसला. घाबरलेल्या महिलांनी मोबाइलवरून याची माहिती सचिन साळी यांना दिली. साळी यांनी बागवानला कारमधून ओढून काढले. त्यानंतर बागवान साळी यांना मारण्यासाठी त्यांच्या पाठीमागे लागला. त्याच्या हल्ल्यात कारमधील अर्चना साळी यांच्यासह अश्विनी मोहिते आणि सचिन साळी हे जखमी झाले. लक्ष्मीपुरी पोलिस आणि नागरिकांनी पाठलाग करून हल्लेखोर बागवान याला पकडले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस