शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील आयजी ऑफिस पुण्याला स्थलांतराचा पुन्हा घाट, दक्षिण महाराष्ट्राची राजकीय प्रतिष्ठा पणाला

By उद्धव गोडसे | Updated: July 4, 2025 17:50 IST

ऐतिहासिक संदर्भ पुसण्याचा प्रयत्न 

उद्धव गोडसेकोल्हापूर : पोलिस आयुक्तालय कोल्हापुरात सुरू व्हावे, ही मागणी सुरू असतानाच कोल्हापुरातील विशेष पोलिस महानिरीक्षकांचे (आयजी) कार्यालय पुण्याला स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सीमा आंदोलन आणि दक्षिण महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी सुरू केलेल्या आयजी ऑफिसचा ऐतिहासिक संदर्भ पुसण्याचा हा डाव आहे. त्यामुळे हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, अशी माहिती काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दिली.बेळगावसह निपाणी, धारवाड, कारवार आणि सीमाभाग महाराष्ट्रात सहभागी करावा, या मागणीवरून सीमा भागात आंदोलन पेटताच तत्कालीन राज्यकर्त्यांनी कोल्हापुरात आयजी ऑफिस सुरू केले होते. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण, अशा पाच जिल्ह्यांचा प्रशासकीय कारभार या कार्यालयातून चालतो. आंदोलनासह कायदा सुव्यवस्था राखणे आणि प्रशासकीय कामात याचा फायदा झाला.अलीकडे कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या आणि गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याने आयुक्तालय सुरू व्हावे, या मागणीने जोर धरला आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून आयजी ऑफिस पुण्याला स्थलांतरित करण्याचा घाट घातला जात आहे. पुण्यातील काही आमदारांनी ही मागणी उचलून धरल्याने आयजी ऑफिस आणि गृह विभागाने तसा पत्रव्यवहार केला आहे.मात्र, कोल्हापूरकरांनी याला जोरदार विरोध दर्शविला आहे. आयजी ऑफिस पुण्याला स्थलांतरित करण्याचा निर्णय सरकारने घेऊ नये, अन्यथा कोल्हापूरसह दक्षिण महाराष्ट्रातील जनता रस्त्यावर उतरून विरोध करेल, असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला आहे.

पुण्याचा फेरा महागडाआयजी ऑफिसचे स्थलांतर झाल्यास कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूरच्या पोलिसांना पुण्याला फेऱ्या माराव्या लागतील. यात वेळ आणि पैशाचा अपव्यय होणार आहे. पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. यात आणखी भर घालण्यापेक्षा कोल्हापुरातून कामकाज चालणे योग्य असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.