भाजपमधील हालचाली वाढल्या, महाडिक विमानाने मुंबईला; २४ तासात लोकसभा उमेदवारांची घोषणा होणार

By समीर देशपांडे | Published: March 20, 2024 04:16 PM2024-03-20T16:16:54+5:302024-03-20T16:17:10+5:30

त्या २४ तासात लोकसभा उमेदवारांची घोषणा होणार आहे. त्यादृष्टिने महायुतीच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.

Movements in BJP increase, dhananjay Mahadik to Mumbai by plane | भाजपमधील हालचाली वाढल्या, महाडिक विमानाने मुंबईला; २४ तासात लोकसभा उमेदवारांची घोषणा होणार

भाजपमधील हालचाली वाढल्या, महाडिक विमानाने मुंबईला; २४ तासात लोकसभा उमेदवारांची घोषणा होणार

कोल्हापूर  :    लोकसभा उमेदवार निवडीसाठीच्या भाजपमधील हालचाली वाढल्या असून खासदार धनंजय महाडिक यांना तातडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईला बोलावून घेतले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेला ऊत आला आहे. 

 येत्या २४ तासात लोकसभा उमेदवारांची घोषणा होणार आहे. त्यादृष्टिने महायुतीच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. अशातच फडणवीस यांच्याकडून बुधवारी सकाळी धनंजय महाडिक यांना मुंबईला येण्याबाबत निरोप देण्यात आला. त्यामुळे सकाळच्याच विमानाने महाडिक मुंबईला रवाना झाले आहेत. महाडिक हे कोल्हापूर, हातकणंगले आणि सातारा या तीन लोकसभा मतदारसंघांचे क्लस्टरप्रमुख आहेत. त्यामुळे या तीनही जागांच्या निश्चितीच्या प्रक्रियेमध्ये त्यांनाही स्थान देण्यात आले असून याबाबत चर्चा करण्यासाठी त्यांना तातडीने बोलावून घेण्यात आल्याचे समजते.

Web Title: Movements in BJP increase, dhananjay Mahadik to Mumbai by plane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.