शिवाजी पुलाचे संवर्धन न झाल्यास आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:40 IST2020-12-15T04:40:50+5:302020-12-15T04:40:50+5:30

कोल्हापूर : येथील ब्रिटिशकालिन शिवाजी पुलाचे संवर्धन करण्यात यावे तसेच दि. ३१ डिसेंबरपूर्वी देखभालीकरीता कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करावेत अन्यथा ...

Movement if Shivaji Bridge is not conserved | शिवाजी पुलाचे संवर्धन न झाल्यास आंदोलन

शिवाजी पुलाचे संवर्धन न झाल्यास आंदोलन

कोल्हापूर : येथील ब्रिटिशकालिन शिवाजी पुलाचे संवर्धन करण्यात यावे तसेच दि. ३१ डिसेंबरपूर्वी देखभालीकरीता कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करावेत अन्यथा तीव आंदोलन छेडले जाईल, असा इशारा येथील जीवनदान सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

शिवाजी पुलाच्या दुरावस्थेबाबत सात महिन्यांपूर्वी जीवनदान सेवाभावी संस्थेने राष्ट्रीय महामार्ग विभागाला निवेदन दिले होते तरीही पुलाच्या देखभालीची दखल न घेता दुर्लक्ष केल्यामुळे पुलावर झाडे झुडपे वाढून त्याची मुळे दगडामध्ये विखुरल्या आहेत. त्याचे या विभागाला कोणतेच गांभीर्य नाही. ज्या अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आहे त्यांच्यावर कडक प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. पत्रकावर अरुण खोडवे, वसंत लिंगनूरकर, अक्षय बागडी, भगवान खवरे, सुनील निकम, अमित खोडवे, जयवंत सुतार यांच्या सह्या आहेत.

Web Title: Movement if Shivaji Bridge is not conserved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.