कोल्हापूरातून उभी राहतेय थुंकण्याविरोधातील चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 08:07 PM2020-10-01T20:07:11+5:302020-10-01T20:10:56+5:30

Movement against spitting, Kolhapur news, कोरोनाचा विषाणू जगभर पसरत असताना रस्त्यावर थुंकण्यामुळे रोगराई पसरते. ही सवय घालवण्यासाठी जनजागृती आणि कारवाई करत 'कोल्हापूर अँटी स्पिट मुव्हमेंट' या नावाने एक अनोखी आणि नवीच चळवळ कोल्हापूरात सुरु झाली आहे.

Movement against spitting from Kolhapur | कोल्हापूरातून उभी राहतेय थुंकण्याविरोधातील चळवळ

कोल्हापूरातून उभी राहतेय थुंकण्याविरोधातील चळवळ

Next
ठळक मुद्देकोल्हापूरातून उभी राहतेय थुंकण्याविरोधातील चळवळव्हॉटस अप ग्रुप, फेसबुकच्या माध्यमातून जनजागृती

संदीप आडनाईक

कोल्हापूर : कोरोनाचा विषाणू जगभर पसरत असताना रस्त्यावर थुंकण्यामुळे रोगराई पसरते. ही सवय घालवण्यासाठी जनजागृती आणि कारवाई करत 'कोल्हापूर अँटी स्पिट मुव्हमेंट' या नावाने एक अनोखी आणि नवीच चळवळ कोल्हापूरात सुरु झाली आहे.

शाहू महाराजांच्या पुरोगामी चळवळीचे केंद्र असणाऱ्या कोल्हापूरातून ही चळवळ दोन महिलांनी सुरु केली एड्स नियंत्रण विभागाच्या सीपीआर रुग्णालयातील कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यापाठोपाठ सारिका बकरे यांनीही थुंकणाऱ्यांविरोधात प्रथम आवाज उठवला. थुंकणे हा केवळ किळसवाणा प्रकार नसून क्षयरोगाचे मुख्य कारण आहे. हे स्पष्ट झाले असून आता कोरोनासारखा घातक विषाणूही यामाध्यमातून पसरत आहे.

मोहिमेला राज्यभरातून बळ

कोल्हापूरात अ‍ॅन्टी स्पीट मूव्हमेंट या व्हॉटस अप ग्रुपच्या आणि फेसबुकच्या माध्यमातून सुरु झालेल्या या चळवळीला राज्यभरातून प्रतिसाद मिळतो आहे. जळगाव, लातूर, नांदेडबरोबरच सातारा, सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही मोहिम सुरु झाली आहे.

कोल्हापूरातील पहिल्या यशस्वी कृती कार्यक्रमानंतर गांधी जयंतीला २ आॅक्टोबर रोजी दुसरा कार्यक्रम होणार आहे. या मोहिमेत दीपा शिपूरकर, सारिका बकरे, सागर बकरे, आनंद आगळगांवकर, राहुल राजशेखर, अभिजित गुरव आदी कार्यकर्ते स्वयंप्रेरणेने काम करत आहेत.

  • थुंकण्यामुळे पसरणारे आजार : क्षयरोग, न्यूमोनिया, स्वाईन फ्ल्यू, श्वसनाचे विकार, पचनसंस्थेचे आजार, कर्करोग, पुनरुत्पादन क्षमता कमी होेणे, इत्यादी.
     
  • पोलिस कायदा : मुंबई पोलिस अधिनियम १९५१, कलम ११६ अन्वये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, थुंकणे, तंबाखूजन्य उत्पादनांचे उत्पादन, जाहिरात, साठवण, पुरवठा, विक्री करण्यास बंदी.
     
  • कायदा : मुंबई प्रांतिय (प्रादेशिक) अधिनियम १९४९ च्या अनुसूचीतील प्रकरण १४ मध्ये नमूद नियम ५ (१) व (२) मधील तरतूदीनुसार तसेच कलम ६९ नुसार सार्वजनिक ठिकाणी थुंकणे किंवा अस्वच्छता करण्यास मनाई आहे. दंडनीय कारवाईच्या तरतूदीसोबतच संबंधितांकडून आकस्मिक दंड वसूल करता येतो.

 

Web Title: Movement against spitting from Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app