शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नाद खुळा! गिर्यारोहक कस्तुरी सावेकरचे जल्लोषात स्वागत, कोल्हापूरकरांकडून यथोचित सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 15:11 IST

Mountaineer Kasturi Savekar : सर्वात कमी वयात भारतातील माउंट मनस्लू शिखर सर करण्यात कस्तुरी यशस्वी ठरली.

ठळक मुद्देकोल्हापुरातील छत्रपती ताराराणी पुतळा येथे बुधवारी कस्तुरी सावेकरचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

कोल्हापूर : जगातील १४ अष्टहजारी शिखरांपैकी एक अती अवघड असणारे माउंट मनस्लू हे कोल्हापूरची गिर्यारोहक कस्तुरी सावेकर (Kasturi Savekar) या रणरागिनीने सर करून कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. कोल्हापुरातील छत्रपती ताराराणी पुतळा येथे बुधवारी तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

सर्वात कमी वयात भारतातील माउंट मनस्लू शिखर सर करण्यात कस्तुरी यशस्वी ठरली. आज तिचे स्वागत करण्यासाठी कोल्हापुरातील गिर्यारोहण संस्थेचे पदाधिकारी व करवीर नगरीतील नागरिक मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यासाठी उपस्थित होते.

कस्तुरी गिर्यारोहणात एक उंच झेप घेऊन कोल्हापूर नगरीत परतली. तिच्या चेहऱ्यावर जो उत्साह होता तो हिमालयाच्या उंची सारखा होता. तिचे पाऊल करवीर नगरीतील छत्रपती ताराराणी पुतळा चौक येथे पडताच तुतारीचा निनाद आणि टाळ्यांचा कडकडाट... अशा भारावलेल्या वातावरणात स्वागत झाले. यावेळी छत्रपती ताराराणी यांचा साक्षीने कोल्हापूरकरांनी रोपटे, हार, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

छत्रपती ताराराणी यांना वंदन करून फुलांनी सजवलेल्या जीपमधून कस्तुरी दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराज पुतळा यांना अभिवादन करण्यासाठी निघाली. वाटेत अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. यानंतर राजश्री शाहू महाराज पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा यांना पुष्पहार अर्पण करून माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा दृढ निश्चय केला. यावेळी तिचे वडील दीपक सावेकर व आई मनस्विनी सावेकर या दोघांनाही आनंद अश्रू आवरता आले नाहीत. 

कोल्हापूर महानगर पालिकेच्या उपायुक्त दरेकर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. अमर अडके यांनी मोहिमेची माहिती दिली. दुर्ग अभ्यासक प्रशांत साळुखें यांनी प्रास्ताविक केले. तसेच, पंडीत पोवार, हेमंत साळोखे, अरविंद कुलकर्णी, डॉ जे.  एफ. पाटील, उद्योजक प्रसाद कामत, उमेश पोवार, शिवसेना शहर प्रमुख जयवंत हारूगले यांनी कस्तुरीला शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीस आशिर्वाद दिले. या कार्यक्रमास करवीर हायकर्सचे संतोष कांबळे, उमेश कोडोलीकर, तेजस सावेकर, विक्रम कुलकर्णी, अनिल भोसले, आनंदा डाकरे, विजय मोरे, उदय निचिते उपस्थित होते.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEverestएव्हरेस्ट