मोटार, जीपची धडक; पाचजण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:23 IST2021-01-08T05:23:22+5:302021-01-08T05:23:22+5:30
कोल्हापूर : शाहुवाडी तालुक्यात सावे फाटा येथे दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनातील पाच प्रवासी ...

मोटार, जीपची धडक; पाचजण जखमी
कोल्हापूर : शाहुवाडी तालुक्यात सावे फाटा येथे दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनातील पाच प्रवासी जखमी झाले. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. जखमींना तातडीने उपचारासाठी सीपीआर रुग़्णालयात दाखल केले आहे.
जखमींची नावे अशी : राजेश ताराचंद बेलेकर (वय ३४), आकाश रवी दांडेकर (२६), अशिष नवल भावे (२७, सर्व रा. उमरडे रोड, नागपूर), तर दुसऱ्या वाहनातील प्रकाश आनंदा खंदे (३५), बळीराम संतू खंदे (७०, दोघेही रा. सावर्डे बुद्रुक, ता. शाहुवाडी).
नागपूरहून आलेले प्रवासी कोल्हापुरातून रत्नागिरीकडे आपल्या चारचाकी मोटारीतून जात होते. त्याचवेळी सावर्डे बुद्रुक येथील प्रवासी जीपगाडीतून मलकापुरातून बांबवडेकडे जात होते. या दोन्हीही वाहनांची सावे फाटा (ता. शाहुवाडी) येथे धडक झाली, जखमींना तातडीने कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.