शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

Kolhapur: सुळकूड पाणी योजनेबाबत समिती नेमण्याच्या हालचाली, मुंबईत आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 12:19 IST

इचलकरंजी व कागलचे बैठकीकडे लक्ष

अतुल आंबीइचलकरंजी : इचलकरंजी-सुळकूड पाणी योजना अंमलबजावणीसंदर्भात तोडगा काढण्यासाठी संयुक्त समिती नेमण्याच्या हालचाली सुरू आहेत. परंतु समिती नेमून निर्णय होईपर्यंत आचारसंहिता लागल्यास पुन्हा हा प्रश्न प्रलंबित राहणार आहे. तिसऱ्या पर्यायाबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमदार, खासदार आणि कृती समिती एकत्रित ताकद लावून हा प्रश्न सोडवतात की, कोणत्या पर्यायी मार्गात अडकतात, याकडे लक्ष लागले आहे.

शहराला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळावे, यासाठी संघर्ष सुरू आहे. दानोळी योजनेला विरोधानंतर सुळकूड योजना मंजूर झाली. मात्र, तेथील नागरिकांनी विरोध केला. सुमारे १६० कोटींचा निधी मंजूर होऊनही या योजनेची अंमलबजावणी झालेली नाही. इचलकरंजीतील नागरिक योजना व्हावी यासाठी आंदोलनांच्या माध्यमातून संघर्ष करीत आहेत. दूधगंगा काठावरील नागरिकांनी इचलकरंजीला पाणी देण्यास विरोध केला आहे. त्यासाठी तेथेही आंदोलने केली जात आहेत.साडेतीन लाख लोकसंख्या असलेल्या इचलकरंजीला पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दोन्हींकडील लोकप्रतिनिधी तसेच आंदोलनाशी संबंधित कृती समितीमधील सातजणांना आज, शुक्रवारी बैठकीसाठी निमंत्रित केले आहे. दोन्ही ठिकाणची परिस्थिती पाहता संयुक्त समिती नियुक्तीच्या हालचाली शासन पातळीवर सुरू आहेत. तसेच शहराला पाणी देण्यासाठी तिसरा पर्याय कोणता निघू शकतो, याबाबतही चर्चा होणार आहे.समिती नियुक्ती करून योजनेबाबत अभ्यास करून त्याचा अहवाल सादर करून पुन्हा चर्चेच्या बैठका होत राहिल्यास आचारसंहिता लागून हा प्रश्न भिजत राहू शकतो. शहरातील जनतेचा रोष पाहता याचा थेट फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता असल्याने शासन दरबारी बैठक लावून या विषयाची धार कमी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमदार प्रकाश आवाडे, खासदार धैर्यशील माने यांच्यासह कृती समितीमधील प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांनी शहराच्या पाणीप्रश्नासाठी एकमत करून शासनावर दबाव निर्माण करण्याची गरज आहे. त्यामध्ये दुफळी राहिल्यास मूळ विषयाला बगल मिळू शकते. त्यामुळे मंजूर योजनेवर सर्वजण ठाम राहणे आवश्यक आहे.राजकारणविरहित निर्णय आवश्यकया योजनेच्या मंजुरीनंतर कागल तालुक्यातून विरोध सुरू झाला. त्यामध्ये तेथील लोकप्रतिनिधींनी उडी घेतल्याने राजकीय वक्तव्ये सुरू झाली. त्यापाठोपाठ शहरातील आमदार, खासदार आणि कृती समिती यांच्यामध्येही राजकीय टीकाटिप्पणी सुरू झाली. प्रत्येक आंदोलनात होणाऱ्या घोषणाबाजीतही विरोधाभास जाणवला. या घडामोडींतून योजना मात्र लटकून राहिली. त्यामुळे या बैठकीतून राजकारणविरहित निर्णय व्हावा, अशी नागरिकांना अपेक्षा आहे.कृती समितीमधील सातजणांना निमंत्रणस्थानिक आमदार, खासदार यांच्यासह सत्ताधारी पक्षातील इचलकरंजीतील प्रतिनिधींना मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीसाठी बोलविले आहे. कृती समितीमधील प्रताप होगाडे, मदन कारंडे, संजय कांबळे, सयाजी चव्हाण, सागर चाळके, राहुल खंजिरे, अभिजीत पटवा या सातजणांना निमंत्रित केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी