शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

प्रेमसंबंध प्रत्यक्ष पाहणाऱ्या मुलाचा आईकडून छळ, ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आईला प्रियकरांसह अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 12:57 IST

मुलगा दुपारी १२ वाजता शाळेतून अचानक घरी आला. त्यावेळी त्याची आई व प्रियकर मनोज पोवार यांचे घरातच लैंगिक संबंध त्याच्या दृष्टीस पडले. त्यावेळी आई व तिच्या प्रियकराने मुलास मारहाण केली.

कोल्हापूर : प्रियकरांसोबतचे लैंगिक संबंध पोटच्या मुलाने पाहिल्यानंतर ते कोणाला सांगू नये म्हणून क्रूरकर्मा आईने व त्या नराधम प्रियकराने त्या मुलांकडून लाजवेल असे अघोरी कृत्य करून घेत त्याचा अमानुष छळ केला. कोणाला सांगितल्यास तुला विष पाजून ठार मारू, अशी धमकी आईसह दोघांनी दिली. माणुसकीला काळिमा फासणारी घटना कोल्हापूर शहरात घडली.

दरम्यान, संबंधित १५ वर्षांच्या मुलाने नराधम प्रियकारासह आईविरोधात गुरुवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने दोघांनाही अटक केली. मनोज पोवार (वय ३७ रा. बागल चौक) असे त्या संशयित नराधमाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सहा महिन्यांपूर्वी संबंधित मुलगा दुपारी १२ वाजता शाळेतून अचानक घरी आला. त्यावेळी त्याची आई व प्रियकर मनोज पोवार यांचे घरातच लैंगिक संबंध त्याच्या दृष्टीस पडले. त्यावेळी आई व तिच्या प्रियकराने मुलास मारहाण केली. तसेच प्रकार वडिलांना सांगितल्यास तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दोघांनीही दिली.

त्यानंतर पुढील आठवडाभर मुलाची आई व नराधम प्रियकराने त्या मुलाकडून लाजवेल असे किळसवाणे, अघोरी कृत्य वारंवार करून घेतले. हा प्रकार बाहेर कोणाला अगर वडिलांना सांगितल्यास तुला आणि तुझ्या वडिलांना जेवणातून विष घालून ठार मारणार असल्याची धमकी दिली. अशाच पध्दतीने त्या दोघांनी दुसऱ्या भावालाही धमकी दिली होती.

दरम्यान, सहन न झाल्याने मुलाने ही घटना वडिलांना सांगितली, त्यानंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. त्यानुसार मुलाची आई व तिचा नराधम प्रियकर मनोज पोवार या दोघांना गुरुवारी सायंकाळी अटक केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी