शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बाळाला दूध पाजतानाच आईनं सोडले प्राण, कोल्हापुरातील दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 14:30 IST

अचानक घडलेल्या घटनेने चौगले कुटुंबीयांना धक्का बसला

कोल्हापूर : वीस दिवसांची चिमुकली पीयुषाला दूध पाजतानाच आई रचना स्वप्नील चौगले (वय २७, रा. संभाजीनगर स्टँडजवळ, कोल्हापूर) बेशुद्ध झाल्या. हा प्रकार लक्षात येताच नातेवाइकांनी त्यांना तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांना मृत्यूने गाठले. बुधवारी (दि. २३) पहाटे ही घटना घडली. रचना यांच्या दोन मुली आईच्या मायेला पोरक्या झाल्या. अचानक घडलेल्या घटनेने चौगले कुटुंबीयांना धक्का बसला.सीपीआर पोलिस चौकीतून मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगर स्टँडजवळ राहणाऱ्या रचना आणि स्वप्नील यांचा सात वर्षांपूर्वी विवाह झाला. त्यांना सहा वर्षांची मोठी मुलगी आहे. २० दिवसांपूर्वी त्यांना दुसरी मुलगी झाली. प्रसुती झाल्यानंतर चौगले कुटुंबीयांनी छोट्या मुलीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. आठवड्यापूर्वीच तिचे बारसे झाले. आनंदाने तिचे नाव पीयुषा असे ठेवले. माय-लेकी दोघींची तब्येत ठणठणीत होती. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास रचना मुलीला दूध पाजत होत्या. काही वेळाने मुलगी रडू लागली. त्यानंतर पती स्वप्नील यांनी उठून पत्नीला हलवले, तर त्या बेशुद्ध असल्याचे लक्षात आले.तातडीने त्यांनी इतर नातेवाइकांच्या मदतीने पत्नीला सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांच्या सल्ल्याने तिथून सीपीआरमध्ये हलवले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उत्तरीय तपासणीचा अहवाल अद्याप आला नसून, हृदयविकाराने मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे.आशा वर्करचे कामरचना चौगले या आशा वर्कर म्हणून काम करीत होत्या. त्यामुळे प्रसुतीपूर्वी आणि प्रसुतीनंतर काय खबरदारी घ्यावी, याची चांगली कल्पना त्यांना होती. यापूर्वी त्यांच्या आरोग्याची काहीच तक्रार नव्हती. अचानक घडलेल्या या घटनेने सर्वच नातेवाइकांना धक्का बसला. त्यांचे पती स्वप्नील हे गोकुळ शिरगाव एमआयडीसीत एका कंपनीत काम करतात. चिमुकल्या दोन मुलींची जबाबदारी आता वडिलांसह आजी आणि आजोबांवर आली आहे.