शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: लिव्ह-इनमध्ये राहण्याचा आग्रह; आई, भावाच्या मारहाणीत तरुणीचा मृत्यू; तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 11:52 IST

कृत्याचा पश्चाताप

कोल्हापूर : प्रेमीयुगुलाने आम्ही लग्न करणार नाही, लिव्ह इनमध्येच राहण्याचा आग्रह धरल्याच्या रागातून तरुणीच्या नातेवाईकांनी तरुणीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत वैष्णवी लक्ष्मीकांत पोवार (वय २४, रा. शनिवार पेठ, कोल्हापूर) हिचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. ३) रात्री ते गुरुवारी (दि. ४) पहाटेच्या दरम्यान घडली.याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी मृत तरुणीची आई शुभांगी (वय ५०), भाऊ सूरज (वय २०) आणि मामा संतोष बबन आडसुळे (वय ३५, सध्या रा. देवठाणे, ता. पन्हाळा, मूळ रा. इचलकरंजी) या तिघांना अटक केली.याबाबत अधिक माहिती अशी की, खासगी बँकेत नोकरी करणारी वैष्णवी पोवार ही आई आणि लहान भाऊ यांच्यासोबत शनिवार पेठेतील घरात राहत होती. नऊ वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. तिचे ओळखीतील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. दोन्ही कुटुंबीयांचाही याला पाठिंबा होता.मात्र, लग्न न करता दोघे एकत्र राहण्याचा विचार करीत होते. लग्न तरी करा किंवा प्रेमसंबंध तोडा, असा आग्रह वैष्णवी हिच्या आईने धरला होता. त्याबद्दल समजूत काढण्यासाठी शुभांगी पोवार या बुधवारी मुलगी वैष्णवी, मुलगा सूरज आणि भाऊ संतोष यांना सोबत घेऊन एसटीने पुण्याला कात्रज येथे गेल्या. तिथे वैष्णवी आणि तिच्या प्रियकराला लग्न करण्याचा सल्ला दिला. 

मात्र, दोघेही लग्न न करता एकत्र राहण्यावर ठाम होते. त्यामुळे चिडलेल्या शुभांगी मुलगा, मुलगी आणि भावाला घेऊन परत आल्या. ते चौघेही थेट देवठाणे (ता. पन्हाळा) येथे संतोष आडसुळे याच्या घरी गेले. तिथे तिघांनी काठी, दोरी आणि लोखंडी सळईने वैष्णवीला बेदम मारहाण केली. तासभर मारहाण सुरू होती. त्यानंतर रात्री दोनच्या सुमारास सर्वजण जेवण करून झोपले.काही वेळाने वैष्णवीच्या पोटात दुखू लागले. पहाटेच्या सुमारास तिला खासगी रुग्णालयात घेऊन गेले, मात्र प्रकृती अधिकच बिघडत असल्याने कोल्हापुरातील रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. लक्ष्मीपुरी येथील खासगी रुग्णालयात पोहोचल्यानंतर उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याने डॉक्टरांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक प्रकार समोर आला. पोलिसांनी तातडीने तिन्ही संशयितांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

कृत्याचा पश्चातापवैष्णवीने तिचा निर्णय बदलावा, यासाठी नातेवाईकांनी मारहाण केली. तिला जिवे मारण्याचा उद्देश नव्हता. मात्र, मारहाणीत पाठीत, पोटात आणि छातीवर बेदम मार लागल्याने तिच्या शरीरात रक्तस्राव झाला. न कळत झालेल्या कृतीने मुलीचा जीव गेल्यामुळे नातेवाईकांना पश्चाताप झाला.

पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कारमारहाणीत मुलीचा जीव गेला, तर आई, भाऊ आणि मामाला अटक झाली. या घटनेमुळे संपूर्ण पोवार कुटुंब उद्ध्वस्त झाले. घरात दुसरे कोणी नसल्याने पोलिसांच्या मदतीने बंदोबस्तात वैष्णवीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस