शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या महापुराशी दोन हात करुन मातेने दिला गोंडस राजकुमाराला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 16:56 IST

Kolhapur Flood: पावसाने सर्वत्र थैमान घातलेले असताना कोल्हापूर जिल्ह्यामधील गंभीर पूरस्थितीशी दोन हात करत पन्हाळा तालुक्यातील वाघवें येथील गरोदर मातेने एका गोंडस राजकुमाराला जन्म दिला.

कोल्हापूर - पावसाने सर्वत्र थैमान घातलेले असताना कोल्हापूर जिल्ह्यामधील गंभीर पूरस्थितीशी दोन हात करत पन्हाळा तालुक्यातील वाघवें येथील गरोदर मातेने एका गोंडस राजकुमाराला जन्म दिला.

महापुराने जिल्ह्यात गंभीर स्वरूप धारण केल्यामुळे सामान्य नागरिकांना वैद्यकीय सुविधांअभावी वंचित राहावे लागत आहे.     अशीच एक गरोदर माता वाघवे ता.पन्हाळा येथे प्रसूती वेदनेने तळमळत होती.  महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस, कोल्हापूरचे डॉ. अभिजित पाटील यांना ५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री याबाबत समजल्यावर त्यानी त्या मातेला लगेच कोल्हापूरकडे हलविण्याचे ठरवले. थोड्याच अंतरावर पोर्ले-उतरे मार्गावर ओढ्यावर गुढघाभर पाणी आलं होतं. रेस्क्यू टीमला बोलवले तरी किमान चार तास लागले असते. त्यामुळे अशोक पायलट याना सोबत घेऊन ते पाण्यात थोडं पुढे चालत गेले.

 रस्ता वाहून गेला नसल्याची खात्री करुन त्यानी गाडी गुडघाभर वाहत्या पाण्यात घातली. वाघवेत पोहोचून मातेला गाडीत घेतलं.   सीपीआरला जात असताना पुन्हा पाणी थोडं वाढलं होतं. पण मातेची परिस्थिती कठीण होती, त्यामुळे पुन्हा गाडी पाण्यातून  पुढे नेण्यात आली. पुढे  उचगावच्या उड्डाणपूलाच्यापुढे पुन्हा पाणी आलं होतं. इथेही माहिती घेतली आणि याही पाण्यामधून वाट काढून त्यानी मातेला सीपीआरमध्ये सुखरुप पोहोचवलं आणि मातेने गोंडस राजकुमाराला जन्म दिला. बाळ आणि त्याची आई सुखरुप आहेत. 

बाळाच्या आजोबांनी फोन केला आणि पुराच्या पाण्यामधून माझ्या लेकीला वाचवलं. देवासारखं धावून आलात". असं बोलून डॉ. पाटील यांना त्यांनी आशिर्वाद दिला.

या घटनेनंतर डॉ. पाटील यांनी लोकमतशी बोलताना पूरग्रस्त भागामधील गरोदर मातांच्या नातेवाईकांना आवाहन केले की त्यांनी आपल्या मातांचं , लवकरात लवकर सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं, जेणेकरुन त्यांना इमर्जन्सीमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध होईल. तसेच पूरग्रस्त भागामधे शासनाने बोटींची व्यवस्था करावी, अशी मागणीही केली आहे.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूरfloodपूर