शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
2
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
3
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
4
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
5
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
6
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
7
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
8
Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी
9
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
10
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
11
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
12
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
13
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
14
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
15
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
16
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
17
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
18
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
19
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
20
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया

Kolhapur: बुडणाऱ्या मुलाला वाचवायला आई पाण्यात गेली, घाबरुन मुलाने मिठी मारली; दोघांचाही बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 12:12 IST

गणेशोत्सवाच्या तोंडावरच घडलेल्या या घटनेमुळे तालुक्यात हळहळ

गडहिंग्लज (कोल्हापूर) : क्रशरच्या खणीत अंघोळ करताना बुडणाऱ्या मुलाला वाचविताना आईचा मुलासह पाण्यात बुडून मृत्यू झाला. सुजाता सिद्धाप्पा पाटील (वय ३२), मल्लिकार्जुन सिद्धाप्पा पाटील (१०, रा. भडगाव, ता. गडहिंग्लज) अशी त्यांची नावे आहेत. गणेशोत्सवाच्या तोंडावरच घडलेल्या या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सुजाता यांचे मूळ गाव कुरणी (ता. हुक्केरी) आहे. दहा वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे आकस्मिक निधन झाले. पतीच्या निधनानंतर त्या मल्लिकार्जुन आणि आदित्य या दोन मुलांसह माहेरी भडगाव येथील मूकनावरवाडी येथे राहत होत्या. मल्लिकार्जुन गावातील प्राथमिक शाळेत चौथीत तर आदित्य हा पाचवीत शिकत होता. रविवारी दुपारी सुजाता जवळच अदलेल्या क्रशरच्या खणीत कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. मल्लिकार्जुनही सायकलीने खणीकडे गेला होता. अंघोळीसाठी तो खणीत उतरला; मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो बुडू लागला.

मुलगा बुडत असल्याचे लक्षात येताच त्याला वाचवण्यासाठी पाण्यात गेल्या. मात्र, घाबरलेल्या मल्लिकार्जुनने त्यांना मिठी मारल्याने दोघेही पाण्यात बुडाले. सुजातासोबत गेलेली सहा वर्षांची भाची अनुष्का हिने धावत जाऊन घरच्यांना ही घटना सांगितली. तातडीने नातेवाइकांनी खणीकडे धाव घेतली. त्यांनी दोघांना पाण्यातून बाहेर काढले. परंतु, पाण्यात गुदमरल्यामुळे दोघांची प्राणज्योत मालवली होती.

आदित्य झाला निराधारपतीच्या निधनानंतर माहेरी आलेल्या सुजाता मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होत्या. वडिलांच्या निधनानंतर आईच्या छत्राखाली आदित्य व मल्लिकार्जुन वाढत होते. परंतु, आई व लहान भावाच्या मृत्यूमुळे आदित्य निराधार झाला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरdrowningपाण्यात बुडणेDeathमृत्यू