युवा फुटबॉलपटूंना सर्वाधिक संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:03 IST2021-02-05T07:03:37+5:302021-02-05T07:03:37+5:30
गडहिंग्लज : पूर्वीच्या तुलनेत सध्या युवा फुटबॉलपटूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षणासह अद्ययावत क्रीडासाहित्य मिळत आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने देशातील सर्वच ...

युवा फुटबॉलपटूंना सर्वाधिक संधी
गडहिंग्लज :
पूर्वीच्या तुलनेत सध्या युवा फुटबॉलपटूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षणासह अद्ययावत क्रीडासाहित्य मिळत आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने देशातील सर्वच व्यावसायिक संघांना १३, १५ आणि १८ वर्षांखालील संघ सक्तीचे केले आहेत. त्या धर्तीवर ‘युनायटेड’तर्फेही असे संघ तयार करण्यात आले आहेत. त्यांना खेळण्याची अधिकाधिक संधी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळेच भविष्यात युवा फुटबॉलपटूंना सर्वाधिक संधी आहेत, असे प्रतिपादन युनायटेड फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद बार्देस्कर यांनी केले.
येथील एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर युनायटेडतर्फे १८ वर्षांखालील खेळाडूंना किट वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सुरेश कोळकी होते. युनायटेडतर्फे सुरू असलेल्या फुटबॉल स्कूलमध्ये ९ ते १५ वर्षांखालील १२० शालेय खेळाडू सराव करत आहेत. दोन दिवसांच्या निवड चाचणीतून ६० खेळाडूंमधून १८ खेळाडूंची निवड करण्यात आली.
प्रतीक बदामे, प्रवीण पोवार, नुमान मुल्ला, गोपी बनगे, धीरज कानडे या खेळाडूंसह अठरा खेळाडूंना किट, बूट देण्यात आले. यावेळी संचालक जगदीश पट्टणशेट्टी, खजिनदार महादेव पाटील, मनीष कोले, प्रवीण रेंदाळे यांच्याहस्ते खेळाडूंना किट देण्यात आले. बंगळुरु येथे कर्नाटक राज्य फुटबॉल संघटनेतर्फे राज्यस्तरीय १८ वर्षांखालील युथ चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी युुनायटेडच्या अभिषेक पोवार व सिद्धार्थ दड्डीकर यांची, तर युनायटेडच्या सल्लागारपदी निवड झाल्याबद्दल आशिष पाटील यांचा सत्कार झाला.
कार्यक्रमास संदीप कांबळे, अभिजित चव्हाण, सूरज तेली, प्रसन्न प्रसादी, उमेश देवगोंडा यांच्यासह खेळाडू व पालक उपस्थित होते. भूपेंद्र कोळी यांनी स्वागत केले. सचिव दीपक कुपन्नावर यांनी प्रास्तविक केले. मनीष कोले यांनी आभार मानले.
----------------------------------
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे खेळाडूंना किट वाटप करण्यात आले. यावेळी महादेव पाटील, जगदीश पट्टणशेट्टी, अरविंद बारदेस्कर, सुरेश कोळकी, प्रवीण रेंदाळे, आदी उपस्थित होते.
क्रमांक : २८०१२०२१-गड-०२