शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
2
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
3
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
5
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
6
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
7
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
8
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
9
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
10
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
11
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
12
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
13
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
14
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
15
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
16
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
17
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
18
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
19
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
20
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
Daily Top 2Weekly Top 5

Crime News kolhapur: बँकेत बनावट सोने ठेवून उचलले तारण कर्ज, १३ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 14:08 IST

कर्जदार व तारण कर्जासाठी असणारे व्हॅल्युएटर तांबे यांनी संगनमत करुन बनावट सोने ठेवले

कोल्हापूर : कर्जदार व मूल्यनिर्धारक (व्हॅल्युएटर) यांनी संगनमत करून बँकेत बनावट सोने ठेवून सुमारे १३ लाख ४३ हजार २४६ रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात ११ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.गुन्हा नोंद झालेल्यांची नावे अशी- संतोष भालचंद्र तांबे (रा. अनंत अपार्टमेंट, राजारामपुरी ८ वी गल्ली, टाकाळा), सचिन सुरेश सुतार (रा. लक्षतीर्थ वसाहत), राजू तानाजी जाधव (रा. लाड चौक, शिवाजी पेठ), यतीन कुमार वाडकर (श्रीराम विद्यालयनजीक, राजारामपुरी), सुहास साताप्पा मोहिते (रा. शिवगंगा कॉलनी, मोरे मानेनगर), अनिकेत बळवंत कदम (यवलूज, ता. पन्हाळा), प्रकाश विष्णू बुचडे (रा. संभाजीनगर, यवलूज, ता. पन्हाळा), दिलीप गंगाराम चौगले (रा. खोपडेवाडी, ता. गगनबावडा), सागर रामचंद्र दवडते (रा. फुलेवाडी), अभिषेक किशोर पाटील (रा. शिवगंगा अपार्टमेंट, मोरेमानेनगर), शुभम विश्वास जाधव (रा. खांडसरी वसाहत, बालिंगा, नागदेववाडी, ता. करवीर).पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जना स्मॉल बॅंक लि., शाखा संभाजीनगर येथे बॅंकेत सोने तारण कर्ज प्रकरणामध्ये तारण सोन्याची सत्यता व व्हॅल्युएशनकरिता संतोष तांबे यांची नियुक्ती केलेली होती. दि. २८ ऑक्टोबर ते दि. ८ डिसेंबर २०२१ या कालावधीत वेळोवेळी जना स्मॉल बॅंकेच्या संभाजीनगर शाखेत कर्जदार व तारण कर्जासाठी असणारे व्हॅल्युएटर तांबे यांनी संगनमत करुन सोने तारण कर्जासाठी बनावट सोने ठेवले. त्यावर सोने तारण कर्ज प्रकरण मंजूर करून बॅंकेतून १६ लाख ३३ हजार ३२५ रुपयांची उचल केली.त्यापैकी २ लाख ८७ हजार ०७९ रुपये इतकी रक्कम सोने तारण कर्जासाठी परत भरली. उर्वरित १३ लाख ४६ हजार २४६ रुपये भरणा केला नाही. त्यानुसार बॅंकेची फसवणूक केली. त्याबाबत अनिस सिकंदर पठाण (रा. सर्किट हाऊस, कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. त्याबाबत व्हॅल्युएटर व कर्जदार अशा एकूण ११ जणांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीGoldसोनंbankबँक