मोरस्करवाडीस पाणी टंचाईच्या झळा : रानोमाळ वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 10:14 PM2018-04-20T22:14:32+5:302018-04-20T22:14:32+5:30

गारगोटी : नैसर्गिक ‘स्रोत आटत चालल्याने भुदरगड तालुक्यातील मोरस्करवाडी येथे पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत.

 Morskarwadias water scarcity: Rann of speech | मोरस्करवाडीस पाणी टंचाईच्या झळा : रानोमाळ वणवण

मोरस्करवाडीस पाणी टंचाईच्या झळा : रानोमाळ वणवण

Next
ठळक मुद्देनियोजनाअभावी पाणीपुरवठा करणारी शासकीय योजना पाण्याअभावी कुचकामी

गारगोटी : नैसर्गिक ‘स्रोत आटत चालल्याने भुदरगड तालुक्यातील मोरस्करवाडी येथे पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत. गावास पाणीपुरवठा करणाऱ्या शासकीय नळ पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी कुचकामी ठरत असून, ग्रामपंचायतीने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन न केल्याने नागरिकांना विहिरीतील हिरवट दूषित पाणी प्यावे लागत आहे. तर स्वच्छ पाण्यासाठी रानोमाळ वणवण करीत पाणी आणून तहान भागवावी लागत आहे.
मोरस्करवाडी गावाला सायफन पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी २२ लाखांची नळपाणी योजना झाली; पण ही योजना पाणी उपलब्ध नसल्याने कुचकामी व निष्क्रिय ठरत आहे. सायफन पद्धतीचे पाणी थेंब थेंब विहिरीत पडते. त्या हिरवट पाण्यावर ग्रामस्थ तहान भागवितात. दूषित पाण्यामुळे रोगराईचा धोका निर्माण होण्याची भीती आहे. येथील विहिरीवर पाण्यासाठी अहोरात्र गर्दी असते. पंडितराव माईन्सच्या मिणचे खोºयाला हादरवून टाकणाºया ब्लास्टिंगमुळे पाण्याचे प्रवाह बदलून आटत चालल्याचे ग्रामस्थ सांगतात. ४00 लोकवस्तीचे हे गाव असून, दुर्गम ठिकाणी असल्याने पाण्याचे अन्य कोणतेही साधन येथे उपलब्ध नाही. त्यामुळे लहान मुले, महिलांसह आबालवृद्धांना घागरभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालून जंगलातून भटकंती करावी लागत आहे.
दिवसेंदिवस येथील पाणीप्रश्न गंभीर बनत चालल्याने ग्रामस्थ अस्वस्थ झाले आहेत. प्रत्येकवर्षी मोरस्करवाडीत तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. निद्रिस्त प्रशासनाने येथील पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

पाणीप्रश्नाबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी देऊनही दखल घेतली जात नाही. महिला जीव धोक्यात घालून विहिरीतून पाणी आणतात. पाणी प्रश्नावर लवकरात लवकर उपाययोजना करावी.
- विलास मोरस्कर, माजी सरपंच

Web Title:  Morskarwadias water scarcity: Rann of speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.