‘मॉर्निंग स्पोर्टस’च्या खेळाडूंची स्मशानभूमीत सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:24 IST2021-05-24T04:24:12+5:302021-05-24T04:24:12+5:30

कोल्हापूर : येथील मॉर्निंग स्पोर्टसच्या २० खेळाडूंनी पंचगंगा स्मशानभूमीत जाऊन कोरोनबाधित शवांवर अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कार करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना विश्रांती ...

Morning Sports Players' Cemetery Service | ‘मॉर्निंग स्पोर्टस’च्या खेळाडूंची स्मशानभूमीत सेवा

‘मॉर्निंग स्पोर्टस’च्या खेळाडूंची स्मशानभूमीत सेवा

कोल्हापूर : येथील मॉर्निंग स्पोर्टसच्या २० खेळाडूंनी पंचगंगा स्मशानभूमीत जाऊन कोरोनबाधित शवांवर अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कार करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना विश्रांती देण्यासाठी त्या खेळाडूंनी हा उपक्रम राबविला. कोरोना प्रतिबंधासाठी पीपीई किट, हातमोजे परिधान करून सकाळी दहा ते सायंकाळी साडेचार या वेळेत सरण रचण्यापासून राख एकत्र करण्यापर्यंतची सर्व कामे त्यांनी केली.

कोरोनाचा उद्रेक झाल्याने मृतांची संख्या वाढते आहे. कोरोनाने मृत झाल्यानंतर जवळचे नातेेवाईकही दुरावतात. अंत्यसंकार करण्यापासूनही ते लांब राहतात; पण अतिशय धाडसाने दोन महिन्यांपासून अखंडपणे बाधित शवांवर महापालिकेचे कर्मचारी विधीवत अंत्यसंस्कार करीत आहेत. स्वत:चा जीव धोक्यात घालून ते हे काम करतात. त्यांना ड्यूटीवर असताना काही काळ विश्रांती मिळण्यासाठी मॉर्निंग स्पोर्टसच्या २० खेळाडूंनी स्मशानभूमीत जात अंत्यसंस्कार केले. स्पोर्टचे श्रीधर गाडगीळ, युवराज संकपाळ, योगेश सूर्यवंशी, विनायक बोडके, शामराव पाटील, संपत पाटील, रवींद्र बावडेकर, आदींच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, आमदार चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम केल्याचे श्रीधर गाडगीळ यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

चौकट

जीवनावश्यक साहित्याचे वाटप

मॉर्निंग स्पोर्टसच्या खेळाडूंनी स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना एक महिना पुरेल इतके जीवनावश्यक साहित्य मोफत वाटले. शिवाजी पूल आणि वडणगे फाट्यावरील बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना चपाती-भाजीही त्यांनी वाटली.

फोटो ओळी

फोटो : २३०५२०२१ कोल पंचगंगा स्मशानभूमी

फोटो : नसीर अत्तार

Web Title: Morning Sports Players' Cemetery Service