मध्यवर्ती बसस्थानकाजवळ वीसहून अधिक अतिक्रमण पाडली, महापालिकेची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 14:34 IST2019-12-18T14:30:41+5:302019-12-18T14:34:11+5:30
कोल्हापूर शहरातील बंदिस्त पार्किंग खुली करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. या मोहिमेतंर्गत मध्यवर्ती बसस्थानकासमोरील वीसहून अधिक अतिक्रमण बुधवारी पाडण्यात आले.

महापालिका प्रशासनाने कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील पार्किंगच्या जागी केलेले अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने पाडले.
ठळक मुद्देमध्यवर्ती बसस्थानकाजवळ वीसहून अधिक अतिक्रमण पाडलीमहापालिकेची कारवाई
कोल्हापूर : शहरातील बंदिस्त पार्किंग खुली करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे. या मोहिमेतंर्गत मध्यवर्ती बसस्थानकासमोरील वीसहून अधिक अतिक्रमण बुधवारी पाडण्यात आले.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी ही कारवाई केली. मध्यवर्ती बसस्थानकासमोरील लाईनमध्ये असलेल्या अनेकांनी याठिकाणी पाच ते सहा फूट पक्के बांधकाम या लोकांनी केले होते. पार्किंगसाठी असलेल्या या जागेतील हे अतिक्रमण महापालिकेच्या पथकाने पाडले. जवळपास दोन तास ही मोहिम सुरु होती.
महानगरपालिकेने जेसीबीच्या सहाय्याने बसस्थानक परिसरातील सहा ते सात ठिकाणी पार्किंगच्या जागी असलेल्या पक्क्या बांधकामावर कारवाई करण्यात आली.