शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

उर्दू माध्यमातील निम्म्याहून अधिक विद्यार्थ्यांची सातवीनंतर सुट्टीच, सर्वाधिक मुलींची संख्या

By भीमगोंड देसाई | Updated: December 20, 2024 12:41 IST

शैक्षणिक भविष्य अंधकारमय, हायस्कूल, कॉलेजची संख्या कमी

भीमगोंडा देसाईकोल्हापूर : शहरातील महापालिकेच्या उर्दू माध्यमात शिकणाऱ्या १०५३ पैकी सातवीनंतर केवळ ४०२ विद्यार्थीच बारावीपर्यंत शिक्षण घेत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. निम्याहून अधिक म्हणजे तब्बल ६५१ विद्यार्थी पुढील शिक्षणाला कायमस्वरूपी सुटी देत आहेत. शाळा सोडलेली मुले बालवयातच आई, वडिलांसोबत कष्टाची किंवा फळे, भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करताना दिसतात. मुलींची लग्न करून दिली जातात. हुशार असून, हे विद्यार्थी पुढील शिक्षणापासून वंचित राहत आहेत.

राजर्षी शाहू महाराज यांनी त्या काळी सर्व समाजांतील मुले शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी जातीनिहाय वसतिगृह सुरू केली. शिक्षणाला प्रोत्साहन दिले. मात्र काळाच्या ओघात बदल करीत केलेल्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढते आहे. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी काही महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत पहिलीपासून इंग्रजी, सेमी इंग्रजी सुरू केले आहे. या शाळांचा नावलौकिकही आहे. पण उर्दू शाळांमध्ये असा बदल झाला नाही.पाचपैकी एका शाळेत सेमी इंग्रजीचा प्रयोग झाला. पण तो फारसा यशस्वी झाला नाही. म्हणून तब्बल १०५३ विद्यार्थी उर्दू माध्यमातून शिक्षण घेतात. पण सातवीनंतर निम्याहून अधिक विद्यार्थी पुढील शिक्षण घेत नाहीत. बारावीनंतर उर्दूतून पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अधिकृत आकडेवारीही उपलब्ध नाही, इतकी अनास्था शासकीय शिक्षण प्रशासनामध्ये आहे.

उर्दू माध्यमातील विद्यार्थी संख्या..- पहिली ते सातवीपर्यंत : १०५३मुले : ४०७मुली : ६४६- सातवी ते बारावीपर्यंत : ४०२मुले : ११९मुली : २८३- सातवीपर्यंतच्या एकूण शाळा : ५बारावीपर्यंत शाळा : २

‘मराठी’ शाळांकडेच दुर्लक्ष; तर उर्दूचे काय?शहरातीत महापालिकेच्या असणाऱ्या ५३ मराठी माध्यमांच्या शाळांमध्येच गुणवत्तापूर्ण शिक्षण, सेवा, सुविधा मिळण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. वर्गखोल्या, संरक्षण भिंतीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून आवश्यक तितका निधी मिळत नाही. मराठी माध्यमाच्या शाळांची अशी स्थिती असेल तर उर्दू माध्यमातील शाळांकडे कोण पाहणार? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

करिअर, उच्चशिक्षणात संधी कमी असल्याने दहा वर्षांच्या तुलनेत अलीकडे उर्दू माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. म्हणून राज्य शासनाने शाळांमध्ये उर्दू विषय ऐच्छिक करावा. करिअरमध्ये जागतिक पातळीवर प्रचंड स्पर्धा आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजीला महत्त्व आले आहे. म्हणूनही मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकविण्याला प्राधान्य दिले आहे. - आदिल फरास, माजी नगरसेवक, कोल्हापूर 

सातवीनंतर पुढील शिक्षणासाठी उर्दू माध्यमांच्या हायस्कूल जवळपास पुरेशा प्रमाणात नाहीत. म्हणून मुस्लीम समाजातील अनेक कुटुंबांना आपल्या मुलांचे पुढील शिक्षण थांबवावे लागत आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या मुलींची आहे. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळालेच पाहिजे. पण सध्या असे होताना दिसत नाही. - हुमायून मुरसल, अभ्यासक, मुस्लीम समाज, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSchoolशाळाStudentविद्यार्थीMuslimमुस्लीम