शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ५० टन कचरा पंचगंगेत वाहून आला, राजाराम बंधाऱ्याजवळ तटला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 13:45 IST

कचऱ्यात प्लास्टिकच्या बाटल्यांची संख्या लक्षणीय

रमेश पाटील कसबा बावडा: कोल्हापूर शहर आणि उपनगरात काल, गुरुवारी झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे जयंती नाल्यातून वाहून आलेला ५० टनहून अधिक कचरा राजाराम बंधाऱ्याजवळ नदीपात्रात तटला आहे. साधारणता दोन एकराचे क्षेत्रफळ मावेल इतका हा कचरा नदीपात्रात पसरला होता. महापालिकेने जेसीबीच्या साह्याने हा कचरा हटवण्याचे काम तात्काळ सुरू केले असले तरी याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.गुरुवारी दुपारी शहर आणि परिसराला ढगफुटीसदृश्य पावसाने झोडपून काढले. गटारे भरून पाणी रस्त्यावर वाहू लागल्याने रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले. या पाण्यातून मोठ्या प्रमाणात कचराही वाहून आला. कचरा जयंती नाल्याद्वारे पंचगंगा नदीतून वाहत राजाराम बंधारा येथे अडकला. याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महापालिका यंत्रणेला जाग आली.एक जेसीबी, एक डंपर, तीन ट्रॅक्टर आणि काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सुमारे ५० टनाहून अधिक कचरा यावेळी नदीपात्रातून काढण्यात आला. यावेळी बंधार्‍यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. त्यामुळे नेहमी या मार्गावरून जाणाऱ्या लोकांची गैरसोय झाली.जबाबदार कोण ? या कचऱ्यात प्लास्टिकच्या बाटल्या, कचरा भरून टाकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, थर्माकोलचे कागद, लाकडं आणि अन्य इतर कचरा मोठ्या प्रमाणात दिसून आला. या कचऱ्याकडे बघितल्यानंतर याला जबाबदार कोण ? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.