शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कोल्हापूरात धोकादायक इमारती उतरवण्यास प्रारंभ, शंभरहून अधिक नोटीसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 18:26 IST

मुंबईपाठोपाठ पुण्यात भींती कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर कोल्हापूर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यांनी धोकादायक इमारती उतरवण्यास मंगळवारपासून प्रारंभ केला आहे. तत्पुर्वी शहरातील सुमारे शंभरहून अधिक धोकादायक इमारतींना उतरुन घेण्याच्या तसेच स्ट्रक्चरल आॅडीट करुन घेण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत.

ठळक मुद्देकोल्हापूरात धोकादायक इमारती उतरवण्यास प्रारंभ, शंभरहून अधिक नोटीसा स्ट्रक्चरल आॅडीट करुन घेण्याच्या नोटीसा

कोल्हापूर : मुंबईपाठोपाठ पुण्यात भींती कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर कोल्हापूर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यांनी धोकादायक इमारती उतरवण्यास मंगळवारपासून प्रारंभ केला आहे. तत्पुर्वी शहरातील सुमारे शंभरहून अधिक धोकादायक इमारतींना उतरुन घेण्याच्या तसेच स्ट्रक्चरल आॅडीट करुन घेण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत.

जुन्या कोल्हापूरात म्हणजेच बिंदू चौक सबजेल परिसर, गंगावेश, महाद्वार रोड (अंबाबाई मंदीर परिसर), शिवाजी रोड, हत्तीमहल रोड या परिसरात धोकादायक इमारतींची संख्या अधिक आहे.संततधार पावसामुळे मुंबई आणि पुण्यामध्ये धोकादायक इमारती कोसळल्याने अनेकांचे बळी गेले. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरातही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोल्हापूर शहरात पावसाळ्यापूर्वी सुमारे १०० हून अधिक धोकादायक इमारतींच्या मालकांना महापालिकेने जीर्ण इमारती उतरुन घ्याव्यात, इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडीट करुन घ्याव्यात अशा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. पण या नोटींसांना बहुतांशी घरमालकांनी केराची टोपली दाखविल्याचे स्पष्ट दिसते.

दुमजली तीन घरे उतरलीशहरातील अतिधोकादायक इमारतीच्या गणनेत असलेली बिंदू चौक सबजेल समोरील आझाद गल्लीतील वसंतराव बाबुराव जामदार यांच्या नावे दोन, कमल वसंत सुर्यवंशी यांच्या नावे असणाऱ्या एक अशा सुमारे तीन धोकादायक, जीर्ण झालेल्या दुमजली इमारती महापालिका प्रशासनाने जेसीबी मशीनच्या सहाय्याने उतरवल्या. यासाठी २० कर्मचारी तसेच पोलीस व वाहतुक पोलिसांचे सहकार्य घेण्यात आले.प्रमाणपत्र सादर न करणाऱ्यास २५ हजाराचा दंडमहानगरपालिका अधिनियम १९४९ कलम २६४ (४), २६८(१) नुसार या इमारतीत राहणे धोकादायक असून त्यांनी इमारत रिकामी करावी. कलम २६५ (अ)नुसार नोटीस मिळाल्यानंतर धोकादायक इमारत मालकाने संबधीत इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडीट करुन इमारत सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र महापालिकेस सादर करावे अन्यथा इमारत मालकास २५ हजार रुपये दंडाला सामोरे जावे लागणार आहे. 

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर