शाहूवाडी तहसील कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:19 IST2020-12-25T04:19:57+5:302020-12-25T04:19:57+5:30
मलकापूर प्रतिनिधी : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची... धिक्कार असो धिक्कार असो मोदी सरकारचा धिक्कार असो. अशा घोषणा ...

शाहूवाडी तहसील कार्यालयावर मोर्चा
मलकापूर प्रतिनिधी :
जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची... धिक्कार असो धिक्कार असो मोदी सरकारचा धिक्कार असो. अशा घोषणा देत शाहूवाडी तहसील कार्यालयावर शाहूवाडी तालुका शेतकरी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व भाई भारत पाटील यांनी केले.
शाहूवाडी पंचायत समिती, अंबाबाई मंदिर, मार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर गेल्यावर मोर्चा पोलिसांनी अडविला. यावेळी भाई भरत पाटील म्हणाले, केंद्र शासनाची दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनात दडपशाही चालली असून, त्यांचे दिवस भरलेले आहेत. शेतकऱ्यांच्या अंगावरती भर थंडीत पाण्याचा फवारा मारणाऱ्या व त्यांचे आंदोलन मोडून काढणाऱ्या केंद्र शासनाचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. शाहूवाडीचे तहसीलदार गुरू बिराजदार यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मोर्चात राजेंद्र देशमाने, नामदेव पाटील, शेतकरी संघटनेचे सुरेश माहुटकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दत्ता पवार, के. के. पाटील, सुदाम कांबळे, रायसिंग पाटील, तुकाराम तळप, प्रणव आदित्य थोरात, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.