शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: आषाढ यात्रेसाठी सेवानिवृत्त पोलिसाकडून पैसे उकळले, इस्पुर्ली ठाण्याचे तिघे अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 19:17 IST

पोलिस अधीक्षकांनी घेतले फैलावर

कोल्हापूर/दिंडनेर्ली : आषाढ महिन्यात इस्पुर्ली पोलिस ठाण्याकडून झालेल्या जत्रेसाठी व्यावसायिकांकडून पैसे उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका निवृत्त पोलिसानेच ऑनलाइन पैसे दिल्याच्या स्क्रीन शॉटसह पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली. याती गंभीर दखल घेऊन अधीक्षक योगेश कुमार यानी सोमवारी (दि. ११) इस्पुर्ली पोलिसांची झडती घेतली. लवकरच यातील तीन पोलिसांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.आषाढ महिन्यात सर्व पोलिस ठाण्यांमध्ये जत्रेची लगबग असते. वर्गणी काढून ही जत्रा साजरी केली जाते. इस्पुर्ली ठाण्यातील काही पोलिसांनी जत्रेच्या निमित्ताने व्यावसायिकांकडे जबरदस्तीने पैशांची मागणी केली. पोलिस ठाण्यातून सेवानिवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्याचे परिसरात फार्महाऊस आहे. त्यांच्याकडून पाच हजार रुपये ऑनलाइन स्वीकारले.याबाबत तक्रार येताच पोलिसांनी करवीरचे उपअधीक्षक सुजित क्षीरसागर यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. क्षीरसागर यांनी तीन पोलिसांसह प्रभारी अधिकाऱ्यांची चौकशी करून चौघांना सोमवारी अधीक्षकांसमोर उभे केले. अधीक्षकांनी प्रभारी अधिकाऱ्यांसह चौघांचीही कानउघडणी केली. प्रश्नांची सरबत्ती करून त्यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. यावेळी तिन्ही पोलिसांसह त्यांचे प्रभारी अधिकारी प्रचंड तणावात होते.

चुकीला माफी नाहीयाबाबत विचारणा केली असता, दोषींवर कारवाई होणारच. मुद्दाम केलेल्या चुकीच्या कामाला माफी मिळणार नाही, असे पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी स्पष्ट केले. व्यक्ती बदलण्यापेक्षा व्यक्तींमधील दोष सुधारण्यासाठी कारवाई केली जाते. चुका होऊ नयेत, याची खबरदारी कर्मचाऱ्यांनी घ्यावी. अन्यथा कारवाई होणारच, असे त्यांनी सांगितले.