मनपा निवडणुकीचे भवितव्य ठरणार सोमवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:31 IST2021-08-14T04:31:05+5:302021-08-14T04:31:05+5:30

बेळगाव मनपा वॉर्ड पुनर्रचना आणि नवे वॉर्डनिहाय आरक्षण या मुद्द्यावर कर्नाटक उच्च न्यायालयातील दावा अद्याप सुरू आहे. हा दावा ...

Monday will be the future of municipal elections | मनपा निवडणुकीचे भवितव्य ठरणार सोमवारी

मनपा निवडणुकीचे भवितव्य ठरणार सोमवारी

बेळगाव मनपा वॉर्ड पुनर्रचना आणि नवे वॉर्डनिहाय आरक्षण या मुद्द्यावर कर्नाटक उच्च न्यायालयातील दावा अद्याप सुरू आहे. हा दावा दाखल केलेल्या माजी नगरसेवकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्य निवडणूक आयुक्तांनी निवडणूक जाहीर करण्याचा निर्णय घाईगडबडीने घेतला असल्याचा आरोप करून या विरोधात मेमो देण्यात आला आहे, अशी माहिती दावेकर्त्यांनी दिली आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेवर स्थगिती येण्याची दाट शक्यता असून संकट कायम आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयात ६ तारखेला सुनावणी होती. यावेळी निवडणूक आयोगाचे वकील फनिद्र यांनी फायनल हियरिंगची तारीख वाढवून मागितली. सन्माननीय न्यायालयाने याची तारीख १६ तारखेला दिली. मात्र, ही सुनावणी होण्यापूर्वीच घाईगडबडीने निवडणूक प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.१६ तारखेला अंतिम निर्णय होण्यापूर्वी केलेला हा प्रकार चुकीचा असून त्याविरोधात मेमो घालण्यात आला आहे, अशी माहिती या प्रकरणातील प्रमुख दावेदार धनराज गवळी यांनी दिली. निवडणूक घेण्याला नागरिकांनीही जोरदार विरोध केला असून तशी निवेदने जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहेत.

Web Title: Monday will be the future of municipal elections