शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

मोलॅसिसवर निर्यात शुल्क, इथेनॉल प्रकल्पांना कच्चा माल कमी पडू नये म्हणून उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 17:51 IST

महाराष्ट्रासह तीन राज्यातून निर्यात

चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर : येत्या हंगामात मोलॅसिसचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील इथेनॉल प्रकल्पांना कच्चा माल कमी पडू नये म्हणून त्यावर २५ टक्के निर्यात शुल्क लागू करण्याचा विचार केंद्र सरकारकडून होत आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.देशात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे प्रमाण सध्या १२ टक्के आहे. ते नव्या हंगामाच्या अखेरीपर्यंत १५ टक्क्यांवर नेण्याचे लक्ष्य आहे. नव्या हंगामात साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर मोलॅसिसचे उत्पादनही कमी होईल आणि देशातील इथेनॉल प्रकल्पांसाठी कच्चा माल असलेले मोलॅसिस कमी पडेल, ही शक्यता लक्षात घेऊन त्यावर निर्यात कर लावण्याच्या हालचाली सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

पहिल्या तिमाहीत ६१ कोटींची निर्यातदेशातून २०२२-२३ या आर्थिक वर्षात १६ लाख ९ हजार टन मोलॅसिसची निर्यात होऊन दोन हजार कोटींचे परकीय चलन मिळाले होते. यातून ३८ कोटी लीटर इथेनॉलचे उत्पादन होऊ शकले असते. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत २ लाख ३६१ हजार टनाची निर्यात होऊन सुमारे ६१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

महाराष्ट्रासह तीन राज्यातून निर्यातमहाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात या तीन राज्यांतूनच प्रामुख्याने मोलॅसिसची निर्यात होते. यात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. नेदरलँड, फिलिपाईन्स, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम आणि इटली या पाच देशांमध्ये ते सर्वाधिक पाठवले जाते. तेथे पशुखाद्यात त्याचा वापर होतो.

डिस्टिलरी नसलेल्या कारखान्यांना फटकासध्या आंतरराष्ट्रीय बाजारात मोलॅसिसचा प्रतिटन १० हजार रुपयांवर भाव आहे. भारतात साडेपाच हजाराच्या आसपास दर मिळतो. त्यामुळे निर्यात शुल्क लागू केल्यास त्याचा फटका डिस्टीलरी किंवा इथेनॉल प्रकल्प नसलेल्या कारखान्यांना बसणार आहे.

... तर इथेनॉल प्रकल्प अडचणीतकेंद्र सरकारच्या प्रोत्साहनामुळे अनेक कारखान्यांनी कर्ज काढून इथेनॉल प्रकल्प उभारले आहेत. काहींनी प्रकल्प विस्तार केला आहे. यामुळे महाराष्ट्राची इथेनॉल निर्मिती क्षमता २५० कोटी लीटरहून अधिक झाली आहे. मोलॅसिस कमी पडून हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालले नाहीत तर तेही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने