आजपासून मोहरम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:29 IST2021-08-12T04:29:07+5:302021-08-12T04:29:07+5:30
कोल्हापूर: इस्लामिक नववर्ष म्हणून साजरे होणाऱ्या मोहरमची बुधवारपासून सुरुवात होत आहे. मुस्लीम बोर्डिंग व हिलाल कमिटीने चंद्रदर्शनाची साक्ष दिल्यानंतर ...

आजपासून मोहरम
कोल्हापूर: इस्लामिक नववर्ष म्हणून साजरे होणाऱ्या मोहरमची बुधवारपासून सुरुवात होत आहे. मुस्लीम बोर्डिंग व हिलाल कमिटीने चंद्रदर्शनाची साक्ष दिल्यानंतर ही अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
कॅलेंडरप्रमाणे मंगळवारपासून मोहरमला सुरुवात होणार होती, पण सोमवारी चंद्रदर्शन न झाल्याने एक दिवस पुढे धरण्यात आला आहे. २० रोजी यौम ए आशुरा आहे. मोहरमनिमित्त १९ आणि २० किंवा २० आणि २१ असे दोन दिवसाचे रोजे असतील असेही कमिटीने म्हटले आहे.
दरम्यान, मोहरम सुरू होत असलातरी कोरोना व लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करूनच तो साजरा करावा, धार्मिक विधी करावेत, असे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. १८ रोजी कत्ल की रात व दुसऱ्या दिवशी यौम ए आशुरा यानिमित्ताने निघणाऱ्या मातम मिरवणुका काढता येणार नाहीत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आपापल्या घरात राहूनच मोहरमचा दुखवटा पाळावा, असेही आवाहन केले आहे.