शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

मोका कारवाईतील ईराणी गॅंगचा मोहमद अलीच्या मुसक्या आवळल्या, चार वर्षे देत होता पोलिसांना गुंगारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 14:26 IST

ईराणी गॅंगमधील तिघे अद्याप फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत

कोल्हापूर : वडगाव येथील मोकांतर्गत कारवाईनंतर गेले चार वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा ईराणी गॅंगचा फरारी गुंड मोहम्मद शौकत अली उर्फ इराणी (वय ४४ रा. चिंद्री रोड, हुसनी कॉलनी, गांधी गुंज बिदर, रा. कर्नाटक) याच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वषेण शाखेने आवळल्या. तो बिदर रेल्वे स्टेशन (रा. कर्नाटक) येथे वावरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन त्याला मंगळवारी सायंकाळी अटक केली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वडगाव पोलीस ठाण्यात ईराणी गॅंगला मोका लावला होता. त्यातील चौघे आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरारी होते. त्यापैकी मोहम्मद शौकत अली उर्फ ईराणी हा गुन्हेगार बिदर रेल्वे स्टेशन (रा. कर्नाटक) येथे वावरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस नाईक आसीफ कलायगार यांना मिळाली.त्यानुसार कर्नाटकात खास पोलिसांचे पथक पाठवून मंगळवारी सायंकाळी त्याला अटक केली. ईराणी गॅंगमधील तिघे अद्याप फरारी आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस पथकाचे निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या नेतृत्वाखाली शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, अंमलदार असिफ कलायगार, सुरेश पाटील, विनोद कांबळे, अनिल जाधव यांनी मोहमद अली उर्फ ईराणी याला अटकेची कारवाई केली.त्याला वडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले असून पोलीस उपअधिक्षक रामेश्वर वैजणे हे तपास करत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी